Maharashtra Rains Update: राज्यात परतीचा पाऊस मुसळधार, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट, काही ठिकाणी जीवित हानी

ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस बरसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरांचे छप्पर उडून काहींचे संसार उघड्यावर आले.

Rains | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

राज्यात अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती तर काही ठिकाणी शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जीवितहानी झाल्याच्या घटनाही पुढे आल्या आहेत. प्रामुख्याने कोकण (Konkan), पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra), मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातही (Vidarbha) अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस बरसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरांचे छप्पर उडून काहींचे संसार उघड्यावर आले. परतीच्या पावसामुशे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्याचा कांदा, मका, सोयाबीन यांसह इतरही शेतमालाचे मोठे नुकसान होत आहे. काही शेतकऱ्यांचा माल शेतात पडून आहे. तर काही शेतकऱ्यांचा माल शेतातून बाहेर काढला आहे. मात्र, तो बाजारपेठेपर्यंत पोहोचवता येत नसल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान पाहायला मिळत आहे.

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. प्रामुख्याने धानोरी, लोहगाव, कळस भागात मोठा पाऊस पाहायला मिळाला. पुणे शहरात पुणे शहरातील येरवडा, टिंगरेनगर, धानोरी, नागपूर चाळ, मुंजोबा वस्ती, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, कात्रज, धनकवडी, वाकडेवाडी, ताडीवाला रोड, वाडिया कॉलेज या परिसरात सकल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी झाडांची पडझडही पाहायला मिळाले. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: पुढील 3-4 तासांत राज्याच्या 'या' भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता)

बिड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पुंडी येथे विज पडू एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या शत्रुघ्न लक्ष्मण काकडे (वय 36) यांचा विज अंगावर पडून जागीच मृत्यू झाला. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. काकडे हे शेतात जनावरे चारत होते. पाऊसही पडत होता. इतक्यात आभाळात मोठ्या प्रमाणवर मेघर्जना झाली. मोठा कडकडाट करत विज खाली आली आणि ती काकडे यांच्या अंगावर कोसळली.

ट्विट

ठाणे जिल्ह्यातील भीवंडी, अंबरनाथ, बदलापूर आदी ठिकाणी मोठा पाऊस झाला. पालघर जिल्ह्यातील जव्हार भागात मोठा पाऊस. भातशेतीला या पावसाचा मोठा फटका बसला. अहमदनगर शहरात दुपारी 3.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाऊस पडला. त्यामुळे शहरातील चौकाचौकात पाणीच पाणी पाहायला मिळाले. सकल भागा काही ठिकाणी दुकानांध्येही पाणी शिरले. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात मोठा पाऊस पाहायला मिळाला. भंवडी शहरासह ग्रामिण भागातही मोठा पाऊस झाला.