Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात 'या' भागात यलो अर्लट; हवामान विभागाचा अंदाज मुंबईत जोरदार पावसाची शक्यता
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, पुढचे तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Rain Update: महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात काल पासून पुन्हा पावसाचा (Rain) जोर वाढलेला पाहायला मिळतो. मुंबईत (Mumbai) पावसाने काही ठिकाणी रत्य्यावर पाणी साचलेले. तरीही राज्यात काही ठिकाणी हलका स्वरुपाचा पाऊस असल्याचे चित्र पाहयला मिळतो. मुंबईसह, (Mumbai) ठाणे(Thane), कोकण (Konkan) विदर्भातील (Vidhrbha) काही जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार (IMD), पुढचे तीन ते चार दिवस राज्यात पावसाची दाट शक्यता आहे.
पुढील भागात पावसाचा यलो अलर्ट
राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असताना, हवामान विभागानं आज काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी पाऊस जोरदार असणार असल्याचे सांगितले आहे. उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेची शक्यता वर्तवली आहे. सोलापूर, सातारा, नाशिक, नंदूरबार, ठाणे आणि पालघर हे जिल्हे वगळत अन्य सर्व जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत जोरदार पाऊसाची शक्यता
काल पासून मुंबई सध्या जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईसह उपनगर ठाणे परिसरात चांगला पाऊस झाला. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं रस्त्यावर पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम देखील झाल्याचं चित्र पाहायल मिळालं. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातही (Akola) पाऊसाची झडप पाहायला मिळाली. गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेत. तर गावातील अनेक नदी नाल्यांना पूर आला. अकोला शहरातील शारदानगर, पार्वतीनगर, गुरुदत्तनगर, मेहरेनगर, रेणुकानगरातील घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरले होते.