Maharashtra Rain Update: उद्या कोकण, दक्षिण मध्य-उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता; जाणून घ्या वीजा चमकत असताना कशी घ्यावी दक्षता

उद्या कोंकणात बहुतेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Lightning | Representational image (Photo Credits: pixabay)

महाराष्ट्रात मान्सूनचे (Monsoon) वेळेआधी जोरदार आगमन झाले आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरु आहे. येत्या पाच दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुणे शहर आणि परिसरात शनिवारी (8 जून) सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेक भागात पाणी साचले व त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

उद्या कोंकणात बहुतेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, पालघर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

रायगड, रत्नागिरी, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार, तर सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा आहे. पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना, मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अशाप्रकारे राज्यातील बऱ्याच भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

या काळात वीजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी-

विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत.

दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा.

विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. (हेही वाचा: Mumbai Coastal Road: मुंबईकरांना दिलासा! कोस्टल रोडचा फेज 2 येत्या 11 जूनपासून वाहतुकीसाठी खुला होणार; जाणून घ्या वेळा)

विजेच्या खांबांपासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.

वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी APP’ डाऊनलोड करून घ्यावे.

पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे.

अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif