Maharashtra Rain Update: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

Rain | representative pic- (photo credit -pixabay)

राज्यात येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई, कोकण, ठाण्यासह नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तसेच रत्नागिरी, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, जालना, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस झाला. (हेही वाचा - Jayakwadi Dam Water Level: मराठवाड्यात पाणीसंकट, जायकवाडी धरणात यंदा फक्त 33 टक्केच पाणीसाठा)

पाहा पोस्ट -

दरम्यान, आता पुढील चार ते पाच दिवसात राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ज्ञ के.एस होसळीकर यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच कोकण आणि गोव्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

या पावसामुळे राज्यातील बळीराजा हा सुखावेल ही अपेक्षा आहे, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा हा सुखावला आहे. आता पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मुबलक पाणी मिळू शकते.