Maharashtra Rain Alert: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट तर मराठवाड्यासह विदर्भात यलो अलर्ट

या पावसामुळं काही भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Mumbai Rainfall (PC- ANI)

राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर कुठं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई (Mumbai) उपनगरासह ठाणे, (Thane) पालघर (Palghar) या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.  (हेही वाचा - Maharashtra Weather Forecast: कोकण व मध्य महाराष्ट्रात सक्रिय मान्सूनची स्थिती कायम; येत्या 5 दिवसांत तीव्र हवामानाचा इशारा, जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज)

हवामान विभागाकडून  कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, पालघर आणि मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महााष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

सध्या मुंबईसह ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काही भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुणे जिल्ह्यात धरण परिसरात सुरु असलेल्या पावसानं धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मुठा नदीच्या पात्रात सुरू करण्यात आला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून धरण क्षेत्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif