Maharashtra Weather Update: पुढील आढवड्यात कमी पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

मुंबईसह कोकणात देखील येते काही दिवस कमी पाऊस असणार आहे. असं हवामान विभागाने सांगितले आहे.

Weather Forecast | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Weather Update: राज्यात आज पासून येत्या 20 ऑगस्टपर्यंत कमी पावसाची शक्यता दर्शवली आहे. राज्यात काही ठिकाणीच किरकोळ पावसाची (Rain) शक्यता जाणवत आहेय. मुंबईसह कोकणात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता दर्शवली आहे. हवामान विभागाने राज्यात 'पाऊस-खण्ड ' प्रणालीमुळे  महाराष्ट्रातील खरीपातील जिरायत क्षेत्र पिकांना ओढ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 21 ऑगस्ट नंतर पावसाची शक्यता दर्शवली आहे. कमी पावसाने पुन्हा अनेक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या या दोन महिन्यात पाऊस कमी असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या वर्षात आधीच मान्सून लांबणीवर गेला होता. दरम्यान जुन महिन्याच्या  शेवटच्या आढवड्यात जोरदार पाऊसाने हजेरी लावली होती. बंगालच्या उपसागरातील आर्द्रता ईशान्येकडे म्हणजे प्रशांत महासागरातील दक्षिण कोरियन किनारपट्टीवरील 'खनून' तर जपान किनारपट्टीवरील 'लान' नावाच्या दोन चक्रीवादळानीं (टायफुन) खेचल्यामुळे देशातील दक्षिणेकडील पाच राज्याबरोबर महाराष्ट्रात ह्या पंधरवाड्यात पावसाची उघडीप पाहवयास मिळत आहे.

 

सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील विदर्भ भागात मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. माजी हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणात मात्र केवळ मध्यम पावसाची शक्यता राहणार. तर सोमवार दि.२१ ऑगस्टपासून मान्सूनच्या श्रावण सरी पुन्हा सुरु होतील. पुढील ३ आठवडे म्हणजे रविवार दि. १० सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा, जोरदार तर नव्हे पण काहीशा मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now