Mumbai Rain : राज्यात वरूण राजाचं आगमण, पुढील 48 तासांत 'या' भागात पावसाची शक्यता
विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे.
Mumbai Rain: आज राज्यात महिन्याभरा नंतर पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. राज्यात वरुण राजाचं पुर्नरागमण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला थोडा दिलासा मिळाला आहे. पावसाने आज सकाळ पासून अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाने सुरुवात केली आहे. हवामान खात्यानं पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. पावसामुळे नागरिकांची उकड्यापासून सुटका झाली आहे. राज्यात आजपासून बहुतांश ठिकाणी मॉन्सून सक्रिय होणार आहे.
पावसाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर होतीत, पीकांना जीवदान मिळालं आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. महिना भराच्या प्रतिक्षेनंतर थंडगार वातावरण झालं आहे. अमरावतीत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. विदर्भात देखील पावसाची बॅटींग सुरु झाली आहे. आज आणि उद्या पावसाचा जोर वाढणार आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मुंबई आणि पुण्यात आज पासून पुढील ४८ तास हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असणार आहे. मुंबईत आज पहाटे पासून हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु झाला आहे. सायन, दादर परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाल्याने वाढत्या उकड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पुण्यात आकाशात ढगाळ वातावरण राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.