Maharashtra Politics: शिंदे गटात वादाची ठिणगी, थेट पत्रकार परिषद घेत केला खुलासा
नाशकात थेट पत्रकार परिषद घेत सुहास कांदेंनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.
राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) हल्ली काय सुरु आहे ह्याचा कुणालाचं काही नेम नाही. पण शिंदे गटाचा खिंडार पडणार, शिंदे गटात (Shinde Group) फुट राज्याच्या राजकारणात रोज ऐकायला येतात. तरी आता पुन्हा एकदा शिंदे गटात वादाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे. नाशकात थेट पत्रकार परिषद (Press Conference) घेत सुहास कांदेंनी (Suhas Kande) याबाबत मोठा खुलासा केला आहे. गेले वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) नाशिक (Nashik) दौऱ्यावर असताना सुहास कांदे गैरहजर होते. एवढचं नाही तर जिल्ह्यात होणाऱ्या महत्वाच्या बैठका किंवा कार्यक्रमांना देखील सुहास कांदेंची अनुपस्थिती दिसुन आली. यानंतर सुहास कांदे शिंदे गटातून काढता पाय घेणार का अशी चर्चांना उधाण आलं असताना आज खुद्द सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद घेत स्वतची भुमिका स्पष्ट केली.
सुहास कांदेंनी (Suhas Kande) घेतलेल्या या पत्रकार परिषदेत (Press Conference) त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बद्दल आदर व्यक्त केला आहे. किंबहुना शिंदे साहेबांसोबत सदैव, मरेपर्यंत सोबत आहोत, पद येताच जातात. तिकीट भेटलं नाही तरी चालेल तरी शिंदे साहेबांसोबत असणार आहे. शिंदे साहेब कधीही अन्याय करणार नाही, अन्याय झाला तरी शिंदेसाहेबांसोबत राहून काम करेल, अशी ग्वाही सुहास कांदेंनी दिली आहे. (हे ही वाचा:- Bharat Jodo Yatra: राहुल गांधी कुस्तीच्या फडात, भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधीनी घेतला कोल्हापूरी कुस्तीचा आनंद! पहा व्हिडीओ)
तसेच नाशकात (Nashik) शिंदे गटाचं कार्यालय उघडलयं हेच मला माहिती नव्हतं अशी टिपण्णी सुहास कांदेनी केली आहे. बैठकीची माहिती मिळत नाही, म्हणूनच बैठकीला अनुपस्थित राहतो. शासन, जनसंपर्क आधिकारी यांच्याकडून माहिती मिळत नाही. पीआरओ (PRO) कडून माहिती दिली जात नसेल, दादा भुसेंचा (Dada Bhuse) आदर करतो, मी तक्रार करत नाही. भुसेंचे नेतृत्व मान्य आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. विशेष म्हणजे भुसेंना मंत्री पद द्यावं, पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळविल्याचे सुहास कांदे यांनी सांगितले.