Maharashtra Politics: कडू विरुध्द राणा वाद अखेर मिटला पण बच्चू कडू म्हणतात..

राणा विरुध्द कडू या वादात ज्यांनी मध्यस्थी केली त्यांचे आभार मानतो, असेही आमदार बच्चू कडू म्हणाले.

Bacchu Kadu | (Photo Credit: Facebook)

राज्यात गेले कित्येक दिवसांपासून बच्चू कडू (Bacchu Kadu) विरुध्द रवी राणा (Ravi Rana) असा वाद रंगला आहे. पण आता अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (DCM Devendra Fadnavis) मध्यस्थी नंतर हा वाद अखेर मिटल्याचं चिन्ह आहे. पण तरीही दोन्ही नेत्यांमधील रस्सीखेच मात्र अजून काही कमी झालेली नाही. आज अमरावतीत (Amaravti) शक्ती प्रदर्शन करत बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. 'जली को आग कहते है, बुझी को राख कहते है' म्हणत विरोधकांना आव्हान देत बच्चू कडू यांच्या प्रहार मेळाव्यास सुरुवात केली. तर पुढील निवडणुकीत प्रहारचे तब्बल दहा आमदार निवडून आणू असं वक्तव्य प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलं आहे. तसेच राणा विरुध्द कडू या वादात ज्यांनी मध्यस्थी केली त्यांचे आभार मानतो, असेही आमदार बच्चू कडू म्हणाले.

 

मी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांना मानतो. मात्र माझ्या डोक्यात भगतसिंग (Bhagat Singh) आहेत, त्यामुळे टीका करणाऱ्यांनी विचारपूर्वक बोलावे असा इशाराही त्यांनी दिला. पहिली वेळ होती म्हणून माफ केल्याचे म्हणत बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी रवी राणा यांच्या दिलगिरीनंतर एक पाऊल मागे घेतले असल्याचे दिसून आले. मात्र, यापुढे कोणी 'वार' केला तर 'प्रहार' केल्याशिवाय थांबणार नसल्याचा इशाराही यावेळी कडू यांनी दिला. (हे ही वाचा:-Maharashtra Politics: ..तर मी आठ दिवसात राजीनामा देईल, अब्दुल सत्तारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान)

 

आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. रविवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कडू आणि राणा वादावर दोन तास चर्चा झाली. त्यानंतर सकाळी रवी राणा यांनी सकाळी फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर खुद्द रवी राणा यांनी आपले शब्द मागे घेत दिलगीरी व्यक्त केली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर स्पष्टीकरण दिलं असुन माझ्या फोनवर बच्चू कडू गुवहाटीला गेल्याची माहिती दिली. तरी या विविध वक्तव्यांनंतर हा वाद शमला असेल तरी पुढील कालावधीत रवी राणा किंवा बच्चब कडू यावर काय भुमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.