Maharashtra Politics: अखेर अजित पवार यांनी धक्का दिलाच; एनसीपी आमदार सरकार मध्ये दाखल होण्यासाठी सज्ज, थोड्याच वेळात शपथविधी

अजित पवारांसोबतच आज छगन भुजबळ, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अनिल पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार मंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

Rajbhavan (Pic credit -Sudhir Suryawanshi Twitter)

राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार आज शपथ घेण्याची शक्यता आहे.

अजित पवारांसोबतच आज छगन भुजबळ, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अनिल पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार मंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या एकुण 54 आमदारांपैकी 30 आमदारांनी सरकारला पाठींबा दिला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्यात असून आमदार रोहित पवार देखील त्यांच्या सोबत आहे.

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात होतं. त्यासाठी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाब टाकत होते, अशीही चर्चा सुरू होती. यानंतर आता अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. येत्या काही तासांत अजित पवारांसह राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होणार आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 पैकी 40 आमदारांन सरकारला पाठींबा दिला असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुले यांनी केला आहे. दरम्यान या शपथविधी सोहळ्याला नरहरी झिरवळ, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे सर्व शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात.