SC Blow To Shinde Camp: एकनाथ शिंदे गटाला धक्का, भरत गोगावले यांची प्रतोद पदी निवड बेकायदेशीर- सर्वोच्च न्यायालय

Supreme Court Judgment On Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, शिवसेना, विधानसभा उपाध्यक्षांची भूमिका, राज्यपालांचे अधिकार आणि राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतर बदी कायदा आदींच्या दृष्टीने 'मैलाचा दगड' ठरणाऱ्या खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाने आज (11 मे) निर्णय दिला आहे.

SC Blow To Shinde Camp: एकनाथ शिंदे गटाला धक्का, भरत गोगावले यांची प्रतोद पदी निवड बेकायदेशीर- सर्वोच्च न्यायालय
Eknath Shinde vs Uddhav Thackeray | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Supreme Court Judgment On Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, शिवसेना, विधानसभा उपाध्यक्षांची भूमिका, राज्यपालांचे अधिकार आणि राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतर बदी कायदा आदींच्या दृष्टीने 'मैलाचा दगड' ठरणाऱ्या खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाने आज (11 मे) निर्णय दिला आहे. कोर्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटाला दणका दिला आहे. भरत गोगावले यांची शिंदे गटाकडून  प्रतोद म्हणून करण्यात आलेली निवड कोर्टाने बेकायदेशीर ठरवली आहे. भरत गोगावले (Bharatshet Gogawale) यांची एकनाथ शिंदे यांच्या गटाने प्रतोद म्हणून निवड केली होती. ज्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिली होती. नार्वेकर यांच्या निर्णयावरही कोर्टाने ताशेरे ओढले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का बसला असून, त्याचा राज्याच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे. हे. सन 1973 मध्ये आलेल्या केशवानंद भारती खटल्याप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयाचा खटलाही यापुढे देशाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच या खटल्याकडे आणि त्याच्या सुनावणीकडे महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे आणि लोकशाही आणि राज्यघटना यांचा अभ्यास करणाऱ्या विद्वानांचे लक्ष लागले होते.

दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंर्षात सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात वारंवार उल्लेख करण्यात आलेले नबाम रेबिया प्रकरण (Nabam Rebia Case) मोठ्या खंडपिठाकडे वर्ग करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्मयामुळे उद्धव ठाकरे गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे. उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात नबाम रेबिया प्रकरण मोठ्या खंडपिठाकडे (सात न्यायाधिशांचे बेच) वर्ग करण्यात यावे आणि त्यावर फेरविचार यावा अशी भूमिका मांडली होती. जी न्यायालयाकडून मान्य झाली आहे. नबाम रेबिया प्रकरणात पाच न्यायाधिशांच्या खंडपिठाने निर्णय दिला होता. जो हे प्रकरण सात न्यायाधिशांच्या खंडपिठाकडे वर्ग करुन त्यावर विचार व्हावा असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 11, 2023 12:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).