SC Judgment On Maharashtra Political Crisis: नबाम रेबिया प्रकरण मोठ्या घटनापिठाकडे वर्ग, उद्धव ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडून मान्य

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात वारंवार उल्लेख करण्यात आलेले नबाम रेबिया प्रकरण (Nabam Rebia Case) मोठ्या खंडपिठाकडे वर्ग करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्मयामुळे उद्धव ठाकरे गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

Supreme Court | (Image Credit - ANI Twitter)

Supreme Court Judgment On Nabam Rebia Case: महाराष्ट्राच्या सत्तासंर्षात सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात वारंवार उल्लेख करण्यात आलेले नबाम रेबिया प्रकरण (Nabam Rebia Case) मोठ्या खंडपिठाकडे वर्ग करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्मयामुळे उद्धव ठाकरे गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे. उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात नबाम रेबिया प्रकरण मोठ्या खंडपिठाकडे (सात न्यायाधिशांचे बेच) वर्ग करण्यात यावे आणि त्यावर फेरविचार यावा अशी भूमिका मांडली होती. जी न्यायालयाकडून मान्य झाली आहे. नबाम रेबिया प्रकरणात पाच न्यायाधिशांच्या खंडपिठाने निर्णय दिला होता. जो हे प्रकरण सात न्यायाधिशांच्या खंडपिठाकडे वर्ग करुन त्यावर विचार व्हावा असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.

दरम्यान,कोर्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटाला दणका दिला आहे. भरत गोगावले यांची शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून करण्यात आलेली निवड कोर्टाने बेकायदेशीर ठरवली आहे. भरत गोगावले (Bharatshet Gogawale) यांची एकनाथ शिंदे यांच्या गटाने प्रतोद म्हणून निवड केली होती. ज्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिली होती. नार्वेकर यांच्या निर्णयावरही कोर्टाने ताशेरे ओढले.