Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, NCP, महाविकासआघाडी, अजित पवार गट यांच्यात सकाळपासून घडलेल्या महत्त्वाच्या घटना
या संघर्षाचे पडसाद महविकास आघाडीतही पाहायला मिळतो आहे. आज सकाळपासून राज्याच्या राजकिय वर्तुळात महत्वाच्या घटना घडल्या. त्या खालील प्रमाणे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणत मोठा भूकंप आला. ज्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले. अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आपल्या सहकाऱ्यांसोबत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळतो. या संघर्षाचे पडसाद महविकास आघाडीतही पाहायला मिळतो आहे. आज सकाळपासून राज्याच्या राजकिय वर्तुळात महत्वाच्या घटना घडल्या. त्या खालील प्रमाणे.
अजित पवार यांच्या पक्ष कार्यालयाची स्थापना
आजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाचे (NCP) मुख्य कार्यालय मुंबई येथे सुरू करण्यात आले. अजित पवार यांनी त्या कार्यालयाचे उद्धाटन केले. मंत्रालयापासून अवघ्या काहीचं अंतरावर असलेल्या जागेत हे कार्यालय सुरू झाले.
शिवसेना (UBT) बैठक
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थतीमध्ये त्यांचे निवासस्थान ' मातोश्री' येथे शिवसेना (UBT) पक्षाची एक बैठक पर पडते आहे. या बैठकीला शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
काँग्रेसची बैठक
काँग्रेस पक्षाची एक बैठक विधिमंडळ येथे पार पडत आहे. या बैठकीला काँग्रेस प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक महत्वाचे नेते आणि आमदार उपस्थीत आहेत.
काँग्रेसचा विरोधी पक्षावर दावा
काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला आहे. काँग्रेस हा विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामूळे विरोधी पक्षनेेपद आम्हाला मिळायला हवे. मात्र आम्ही महाविकास आघाडी म्हणून सर्व एक आहोत. आम्ही विचार विनिमय करुन निर्णय घेऊ असे काँग्रेस नेते बाळासहेब थोरात यांनी म्हटले आहे. आगामी निवडणुकाही आम्ही काँग्रेस, शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्रपक्ष एकत्र लढू असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हंटले आहे.