Maharashtra Police: महाराष्ट्र पोलीस बदली, पदोन्नती आदेशाला 24 तासात स्थगिती, भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर
त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून याची सखोल चौकशी करावी. राज्य सरकारने ही चौकशी करावी नाहीतर आम्ही सीबीसी चौकशीची मागणी करुन असेही भाजपने म्हटले आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या (Maharashtra Police Transfer) आणि बढती (Maharashtra Police Promotion ) आदेशाला 24 उलटण्यापूर्वीच स्थगिती दिली आहे. राज्य पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली आणि बढतीसाठी बुधवारी (20 एप्रिल) आदेश जारी केला. त्यानंतर अवघ्या काही तासातच त्याला स्थगिती देण्यात आले. या निर्णयगोंधळामुळे राज्याच्या गृहविभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अर्थात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या मात्र कायम असून त्यावर कोणतीही स्थगिती नसल्याचे सांगितले जात आहे. प्रामुख्याने मुंबई, ठाणे पोलिसांतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आदेशास स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीत पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात राजेंद्र माने, महश पाटील, संजय जाधव, पंजाबराव उगले आणि दत्तात्रय शिंदे यांच्या नावांचा समावेश आहे.
राज्य पोलिसांच्या आदेशाला अवघ्या 24 तासातच का स्थगिती देण्यात आली याबात कोणतेही स्पष्टीकरण अद्याप पुढे आले नाही. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून याची सखोल चौकशी करावी. राज्य सरकारने ही चौकशी करावी नाहीतर आम्ही सीबीसी चौकशीची मागणी करुन असेही भाजपने म्हटले आहे. एका वृ्त्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत भाजप आमदार अतुल भातकळकर यांनी ही मागणी केली आहे.
कोणत्या अधिकाऱ्याची कोठे बदली?
मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांची राज्याच्या विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) येथे बदली.
विशेष पोलीस महानिरीक्षक बदली
विशेष पोलीस महानिरीक्ष दीपक पांडे (महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग)
सुरेश कुमार मेकला (पुणे गुन्हे अन्वेषण विभाग)
रवींद्र शिसवे (राज्य मानवी हक्क आयोग)
उपमहानिरीक्षक पदावरून विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर बढती
लखमी गौतम (आस्थापना, महाराष्ट्र पोलीस)
सत्यनारायण (सागरी सुरक्षा)
एस. जयकुमार (प्रशासन, महाराष्ट्र पोलीस)
निशित मिश्रा ( दहशतवाद विरोधी पथक)
सुनील फुलारी (मोटार परिवहन विभाग)
संजय मोहिते (कोकण परिक्षेत्र)
सुनील कोल्हे (सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग)
दत्तात्रय कराळे (सहआयुक्त, ठाणे शहर)
प्रवीण पवार (संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी)
बी. जी. शेखर (नाशिक परिक्षेत्र)
संजय बाविस्कर (पुणे गुन्हे अन्वेषण विभाग)
वीरेंद्र मिश्रा (उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई)
उपमहानिरीक्षक पदावर बढती देऊन बदली
परमजीत सिंह दहिया (एटीएस)
निवा जैन (नागपूर शहर)
राजेंद्र माने (अतिरिक्त पोलीस आयुक्त
ठाणे शहर), विनायक देशमुख (अतिरिक्त पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग मुंबई)
महेश पाटील (अतिरिक्त पोलीस आयुक्त, मुंबई वाहतूक पोलीस)
संजय जाधव ( अतिरिक्त पोलीस आयुक्त, ठाणे शहर),
दीपक साकोरे (राज्य राखीव पोलीस बल, पुणे)
पंजाबराव उगले (सशस्त्र पोलीस)
श्रीकांत पाठक (मीरा भाईंदर वसई विरार)
विजय पाटील (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)
दत्तात्रय शिंदे ( संरक्षण आणि सुरक्षा, मुंबई)
दरम्यान, अधीक्षक दर्जाच्या अक्षय शिंदे, अतुल कुलकर्णी, मनीष कलवानिया, निमित गोयल, राजा रामासामी, लता फड या अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र यापैकी काही अधिकाऱ्यांच्या बदलीस स्थगिती देण्यात आल्याने पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.