कोविड-19 संकटात नागरिकांना सतर्क करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी जारी केले 'सुरक्षा कॅलेंडर'; दररोज या '5' गोष्टींची उजळणी करण्याचा दिला सल्ला
कोविड 19 संकटाता नागरिकांना सतर्क करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सुरक्षा कलेंडर लॉन्च केले आहे. 'प्रत्येक दिवस सुरक्षा दिवस' असं म्हणत त्यांनी हे कलेंडर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगाला ग्रासून टाकले आहे. जगातील इतर देशांसह भारतातही कोविड-19 (Covid-19) चा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. दरम्यान महाराष्ट्र (Maharashtra) राज्याभोवती कोरोनाचा वेढा अधिक मजबूत झाला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंता वाढवत आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकार, आरोग्य त्याचबरोबर पोलिस यंत्रणा नागरिकांना वेळोवेळी सतर्क करत आहे. आताही महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) 'सुरक्षा कलेंडर' (Suraksha Calendar) लॉन्च केले आहे. 'प्रत्येक दिवस सुरक्षा दिवस' असं म्हणत त्यांनी हे कलेंडर सोशल मीडियावर शेअर केले आहे. (महाराष्ट्र पोलिस कर्मचार्यांना COVID 19 ची लागण होण्याच्या संख्येत मोठी वाढ; 24 तासांत 131 जणांना कोरोनाची लागण!)
"तुम्ही घरून काम करत असताना सुरक्षेला एकही दिवस सुट्टी देऊ नका. तुमच्या रोजच्या कामांच्या यादीत हे काम नसतील तर ते आजच्या आज सामील करा," असा संदेश यातून देण्यात आला आहे. तसंच दररोज 5 गोष्टींचे पालन करण्यास सांगितले आहे. 'घरीच राहणे,' 'मास्क वापरणे,' 'सोशल डिस्टसिंग पाळणे,' 'हात धुणे' आणि 'अफवा न पसरवणे' या गोष्टींची दररोज उजळणी करण्याचा सल्ला याद्वारे देण्यात आला आहे.
Maharashtra Police Tweet:
प्रत्येक दिवस सुरक्षा-दिवस!
तुम्ही घरून काम करत असताना सुरक्षेला एकही दिवस सुट्टी देऊ नका. तुमच्या रोजच्या कामांच्या यादीत हे काम नसतील तर ते आजच्या आज सामील करा.#SafetyCalendar #StayHome #StaySafe pic.twitter.com/RY2ZsBKcYG
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) May 28, 2020
कोरोना व्हायरस संकटात खबरदारीचा उपाय म्हणून या गोष्टींचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिस अहोरात्र मेहनत घेत आहेत. तसंच नियमांचे उल्लंघन होणार नाहीत यासाठी दक्ष आहेत. दरम्यान महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 56948 वर पोहचली आहे. त्यातील 17918 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1897 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on May 28, 2020 02:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

