Coronavirus In Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 381 जणांना कोरोनाची लागण; 3 जणांचा मृत्यू
महाराष्ट्र राज्यात मागील 24 तासांमध्ये सुमारे 381 पोलिस कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे तर 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचे संकट अद्यापही गडद आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात असलेले महाराष्ट्र पोलिस हे कोविड योद्धे देखील कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. राज्यात मागील 24 तासांमध्ये सुमारे 381 पोलिस कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे तर 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाबाधित पोलिस कर्मचार्यांचा आकडा 11,773 पर्यंत पोहचला आहे. तर त्यापैकी 9416 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 2233 पोलिस कर्मचार्यांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.
पोलिस कर्मचारी मार्च महिन्यापासून लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन होणार नाही, राज्यात कायदा व सुव्यवस्था राखली जाईल यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात आहेत. दरम्यान मागील 4-5 महिन्याच्या काळात कोरोना व्हायरसने एकूण 124 जणांचे बळी घेतला आहे. Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स.
ANI Tweet
महाराष्ट्रामध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 548313 पर्यंत पोहचला आहे. त्यापैकी एकूण 381843 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 147513 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)