IPL Auction 2025 Live

महाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये कोविड 19 मुळे आत्तापर्यंत 60 जणांचा मृत्यू; 38 मुंंबई पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश

यामध्ये 3 अधिकार्‍यांचा देखील समावेश आहे.

प्रतीकात्मक फोटो | (PTI photo)

महाराष्ट्रात मागील साडे तीन महिन्यात कोविड 19 चा उद्रेक झाल्यापासून महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) खात्याने 60 कर्मचारी गमावले आहेत. यामध्ये 3 अधिकार्‍यांचा देखील समावेश आहे. अशी अधिकृत माहिती आज (1 जुलै) देण्यात आली आहे. दरम्यान कोविड ने गमावलेल्या 60 पोलिस कर्मचार्‍यांमध्ये 38 मुंबई पोलिस (Mumbai Police) खात्यातील कर्मचारी होते. मुंबई मध्ये आजपासून संचारबंदी लागू; रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत बाहेर पडण्यास मज्जाव

दरम्यान आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्यात 4900 पोलिस कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर यामध्ये मुंबई खात्यातील 2600 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. मागील 24 तासांमध्ये 82 पोलिस कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसवर मात केल्यामुळे हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली आहे. तर आत्तापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या 3700 जणांनी कोविड 19 या आजारावर मात करून ही लढाई जिंकली आहे. पोलिस खात्यामध्ये अजूनही 1015 कर्मचार्‍यांवर उपचार सुरू आहेत. तर महाराष्ट्र पोलिस दलामध्ये  आज मागील 24 तासांमध्ये 77 जणांना  कोरोनाची लागण झाली आहे.

ANI Tweet  

लॉकडाऊन जाहीर केल्यापासून सुमारे 1,39,702 जणांवर नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. तर 29,425 जणांना अटक देखील झाली आहे. 290 प्रकरणांमध्ये पोलिसांवर हल्ला झाला आहे. त्यापैकी 86 जण जखमी झाले तर 54 आरोग्य कर्मचार्‍यांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये 860 जणांना अटक झाली आहे.

पोलिसांनी लॉकडाऊनच्या या काळामध्ये सुमारे 9.95 कोटी दंडाच्या स्वरूपात वसुल केली आहे.