Maharashtra Police Inspector Bail Rejected: मुलीचा विनयभंग करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस निरीक्षकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
56 वर्षीय धनंजय सायरे याच्यावर त्याच्या ओळखीच्या 23 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप होता. त्यानंतर अकोला एसपी बच्चन सिंह यांनी निलंबित केले.
Maharashtra Police Inspector Bail Rejected: महाराष्ट्रातील अकोला येथील खनी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा आरोप असलेले निलंबित पोलीस निरीक्षक धनंजय महादेव सायरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. 56 वर्षीय धनंजय सायरे याच्यावर त्याच्या ओळखीच्या 23 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप होता. त्यानंतर अकोला एसपी बच्चन सिंह यांनी निलंबित केले. याशिवाय त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले होते, ती अजूनही सुरूच आहे. पीडित तरुणी नागपुरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
धनंजय सायरे याने पिडीतेचा छळ केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. या घटनेमुळे पीडितेला मानसिक धक्का बसला आहे. आरोपीने पीडितेचा विश्वासघात करून तिची मोठी मानसिक हानी केल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले.
आरोपीची स्थिती लक्षात घेता त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला जातो, असेही न्यायालयाने नमूद केले. निलंबीत पोलीस निरीक्षक धनंजय सायरे हे अमरावतीचे रहिवासी आहेत. पीडित तरुणीही अमरावतीची रहिवासी आहे. पीडितेचे वडील सायरेला आधीपासूनच ओळखत होते. ही तरुणी अनेक महिन्यांपासून नागपुरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. सायरे यांना मुलीची माहिती मिळताच त्यांनी मुलीशी संपर्क साधून मदत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर सायरेने मुलीला सतत फोन करायला सुरुवात केली. मुलीने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितल्यावर पालकांनी तिला याकडे दुर्लक्ष करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.
18 मे रोजी सायंकाळी सायरे मुलीच्या घरासमोर आल्याचे सांगण्यात येते. घरापासून काही अंतरावर सायरे याने मुलीला थांबवून तिचा हात धरून विनयभंग सुरू केला. यानंतर तरुणीने तात्काळ नंदनवन पोलीस ठाणे गाठून सायरेविरोधात तक्रार दाखल केली.