कोणत्याही संकटात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे; राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शेअर केला महाराष्ट्र पोलिसांचा एक फोटो
कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. दरम्यान, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बाजवत आहेत. राज्यात कोरोनाचे संकट असताना आज निसर्ग चक्रीवादाळाने यात आणखी भर घातली आहे.
संपूर्ण महाराष्ट्र कोरोना विरोधात लढा देत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. दरम्यान, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बाजवत आहेत. राज्यात कोरोनाचे संकट असताना आज निसर्ग चक्रीवादाळाने यात आणखी भर घातली आहे. परंतु, अशा परिस्थितीतही महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी नुकताच महाराष्ट्र पोलिसांचा एक फोटो शेअर केला आहे. कोरोना विरोधात लढा देत असताना महाराष्ट्र पोलीस निसर्ग चक्रीवादळाच्या सामोरे गेले आहे. महाराष्ट्र पोलीस प्रत्येक क्षणाला आपल्या कर्तव्यावर ठामपणे उभी असते, असेही अनिल देशमुख म्हणाले आहेत.
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी आणि संभाव्य धोका असलेल्या मुंबईतील विविध भागांतून आतापर्यंत सुमारे 20 ते 25 हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तर सुमारे 30 हजार नागरिकांनी महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन स्वत: स्थलांतर केले आहे. याच पाश्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडत आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीचे अनिल देशमुख यांनी कौतूकही केले आहे. महाराष्ट्र पोलीस प्रत्येक क्षणाला कर्तव्यावर ठामपणे उभी असते. कोणत्याही संकटात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या महाराष्ट्र पोलिसांचे हे एक बोलके प्रातिनिधिक चित्र आहे, अशा आशायाचे त्यांनी ट्विट केले आहे. हे देखील वाचा-Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत संचारबंदी लागू; नागरिकांना समुद्रकिनारपट्टीवर जाण्यास बंदी
अनिल देशमुख यांचे ट्वीट-
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आज आणखी 47 पोलीस कर्मचाऱ्या कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे महाराष्ट्र पोलीस दलातील कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 556 पोहचली आहे.