Maharashtra Police Bharti 2019: पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई पदांसाठी भरती; जाणून घ्या कसा आणि कधी भरायचा ऑनलाईन अर्ज
महाराष्ट्रात पोलीस विभागात भरती सुरु झाली असून 'पोलीस शिपाई चालक' आणि 'सशस्त्र पोलीस शिपाई' या दोन पदांसाठी ही भरती असणार आहे.
Maharashtra Police Bharti 2019 Procedure: महाराष्ट्रात पोलीस विभागात भरती सुरु झाली असून 'पोलीस शिपाई चालक' आणि 'सशस्त्र पोलीस शिपाई' या दोन पदांसाठी ही भरती असणार आहे. एकूण 1847 जागांवर भरती होणार असून या संबंधित एक जाहिरात नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. या दोन्ही पदांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील व अर्ज भरण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर असेल.
अर्जासाठी किमान शैक्षणिक पात्रता:
पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार बारावी उत्तीर्ण व हलके वाहन [LMV -TR] चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक आहे. परंतु, नक्षलग्रस्थ भागात राहणाऱ्या उमेदवारांसाठी ही अट सातवी उत्तीर्ण अशी ठेवण्यात आली आहे. तर सशस्त्र पोलीस शिपाई [SRPF] या पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
किमान शारिरीक पात्रता:
उंची : (पुरुष- 165 cms) / (महिला- 158 cms)
छाती : पुरुष- 79 cms न फुगवता (नक्षलग्रस्थ उमेदवारांना छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही)
किमान वयोमर्यादा :
31 डिसेंबर 2019 या तारखेपर्यंत
पोलीस शिपाई चालक: 19 ते 28 वर्षे
सशस्त्र पोलीस शिपाई: 18 ते 25 वर्षे
अर्ज करण्यासाठी लिंक
पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई [SRPF] पदाच्या भरतीसाठी पुढील लिंकवर क्लिक करावे - https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/loginPage
या दोन्ही पदांसाठी परीक्षा फी आकारण्यात येणार असून खुल्या प्रवर्गासाठी ही फी 450 रुपये इतकी असेल तर मागासवर्गीय प्रवर्ग व अनाथ मुले यांच्यासाठी फी 350 रुपये असेल.