Jitendra Awhad On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचा आरोप हस्यास्पद- जितेंद्र आव्हाड
असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री कुशाग्र बुद्धीचे देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांचा यामागील हेतू मला कळत नाही. हा हास्यास्पद आरोप आहे. याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
राज्यात गाजत असलेल्या रश्मी शुक्ला फोन टॅपींग प्रकरणावरुन (Phone Tapping Case in Maharashtra) राजकीय पक्षात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपींग प्रकरणाच्या चौकशी अहवालावरुन देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ही टीका करताना हा चौकशी अहवाल जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि नबाब मलिक या मंत्र्यांनी लिहिल्याचे म्हटले. यावर जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले असून, फडणवीस यांनी केलेले आरोप हे हस्यास्पद असल्याचे म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आणि पत्रकार परिषद घेऊनही फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला अहवाल जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलेला आहे. असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री कुशाग्र बुद्धीचे देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांचा यामागील हेतू मला कळत नाही. हा हास्यास्पद आरोप आहे. याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
आव्हाड यांनी पुढे म्हटले आहे की, सिताराम कुंटे यांच्या प्रशासकीय सेवेतील अनुभवाचा आणि त्यांच्या प्रामाणिक पणाचा या वाक्यातून अपमान झाला आहे. एकंदर पोलीस खात्यातील अधिकारी व प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांचं मनोबल खच्चीकरण करण्याच कामच जणू विरोधी पक्षाकडून सुरु आहे. पण याकडे मी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतो. कि जितेंद्र आव्हाड अहवाल लिहू शकतात. एवढं देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले तेच खुप झालं, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Devendra Fadnavis at MHA: महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणांची चौकशी सीबीआयद्वारे करा, अन्यथा कोर्टात जाऊ- देवेंद्र फडणवीस)
दरम्यान देवेंद्र फडणीस यांनी म्हटले होते की, पोलिस बदल्यांसंदर्भात मुख्य सचिवांनी तयार केलेला अहवाल, हा त्यांनी नाही तर कुण्या मंत्र्यांनी तयार केलेला दिसतो. कारण मी त्यांना ओळखतो. या अहवालात ‘एखादा गुन्हा घडण्याची शक्यता असताना सुद्धा टॅपिंगची परवानगी असते‘, हा उल्लेख मुद्दाम वगळण्यात आला आहे.