Maharashtra NCP Crisis: अजित पवार यांच्या बंडामुळे आकडे बदलले, जाणून कोणासोबत किती आमदार; विधिमंडळातील पक्षीय बलाबल

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या रुपात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात बंड झाले. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील पक्षीय बलाबल कामालीची बदलली आहे. राष्ट्रवादीतील शरद पवार आणि अजित पवार समर्थक आमदारांचा आकडा अद्याप तरी स्षष्ट झाला नाही. असे असले तरी त्यात कामालीची स्पष्टता आल्याचे पाहायला मिळते आहे.

Maharashtra Legislature | (File Photo)

Maharashtra NCP Crisis: राज्याच्या राजकारणात घडलेल्या 'पॉवरफूल नाट्या'नंतर महत्त्वपूर्ण घडामोडी घडू लागल्या आहेत. सहाजिकच राज्य विधिमंडळ (Maharashtra Legislature) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांच्या आकडेवारीतही मोठा बदल झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील बंडानंतर आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या रुपात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात बंड झाले. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील पक्षीय बलाबल कामालीची बदलली आहे. राष्ट्रवादीतील शरद पवार आणि अजित पवार समर्थक आमदारांचा आकडा अद्याप तरी स्षष्ट झाला नाही. असे असले तरी त्यात कामालीची स्पष्टता आल्याचे पाहायला मिळते आहे.

अजित पवार, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे सर्व आमदार आपल्यासोबतच आहेत आणि आपणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत, असा दावा करण्यात आला. शिवाय आम्ही पक्षाच्या चिन्हावर निवडणून आलो आहोत. त्यामुळे पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव हे देखील आमच्याकडेच असल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केलेल्या दाव्यात राष्ट्रवादीच्या 43 पैसी 40 आमदारांनी राज्य सरकारला पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे.

अजित पवार यांच्या बंडामुळे राज्य सरकार अधिक भक्कम झाल्याचे बोले जात आहे. आता हे राज्य सरकार शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट अशा रुपात पाहायला मिळणार आहे. राज्याच्या विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहायची तर ती खालील प्रमाणे. (हेही वाचा, NCP Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार कराडकडे रवाना, अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर महाराष्ट्रात उलथापालत)

राज्य सरकार (सत्ताधारी पक्ष)

विधानसभा एकूण सदस्य संख्या -288

बहुमताचा आकडा-145

भाजप-105

शिवसेना (शिंदे गट)- 44

राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 40 (दावा, स्पष्टता नाही)

सरकार समर्थक इतर आमदार - 21 (12 अपक्षांचाही समावेश)

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष

विधानसभा एकूण सदस्य संख्या -288

बहुमताचा आकडा-145

काँग्रेस- 44

शिवसेना (UBT)- 12

राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 13

समाजवादी पार्टी- 2 आमदार

भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी- 1 आमदार

स्वाभिमानी पक्ष-1

पीजेंट्स एंड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया- 1 आमदार

AIMIM- 2 (तटस्थ)

दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत इतरही काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील, धर्मराव आत्राम, सुनील वलसाडे, आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाच्या शपथा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल हेसुद्धा राजभवनात उपस्थित होते. विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेल हे पवार यांचे अत्यंत विश्वासून म्हणून ओळखले जातात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now