Maharashtra Natal New Year Bumper Lottery Results 2021: महाराष्ट्र नाताळ न्यू ईयर भव्यतम लॉटरी संध्याकाळी 5 नंतर होणार जाहीर
महाराष्ट्र नाताळ न्यू ईयर भव्यतम लॉटरी 2021 च्या विजेत्यांच्या यादीमध्ये पहिलं बक्षीस 50 लाख रूपयांचं आहे, दुसरं बक्षीस 10 लाख तर तिसरं बक्षीस 4 लाख रूपयांचं आहे.
यंदा महाराष्ट्र नाताळ न्यू ईयर भव्यतम लॉटरी (Maharashtra Natal New Year Bumper Lottery Results 2021)चं लॉटरीचं तिकीट काढणार्यांसाठी खास दिवस आहे. आज संध्याकाळी या लॉटरीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. नववर्ष 2021 मधील ही पहिलीचं बंपर लॉटरी असल्याने या लॉटरीच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान यावर्षीच्या महाराष्ट्र नाताळ न्यू ईयर भव्यतम लॉटरीचा निकाल ऑनलाईन आणि ऑफलाईन देखील पाहता येतील. अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारच्या lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटलाही भेट देऊ शकता.
महाराष्ट्र नाताळ न्यू ईयर भव्यतम लॉटरी 2021 च्या विजेत्यांच्या यादीमध्ये पहिलं बक्षीस 50 लाख रूपयांचं आहे, दुसरं बक्षीस 10 लाख तर तिसरं बक्षीस 4 लाख रूपयांचं आहे. या लॉटरीची 1 लाख तिकीटं उपलब्ध होती. तिकीटावरील 4 अंकी भाग्यवान नंबर वरून विजेता निवडला जाणार आहे. त्यामुळे हे 4 जादुई अंक तुमचं नशीब आज पालटणार का? हे नक्की पहा. लॉटरी बाबतचे अन्य तपशील नागरिकांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असू शकतात. Dear Lottery Free Home Delivery: खुशखबर! सरकारमान्य 'डियर लॉटरी' ची महाराष्ट्रात मिळणार मोफत घरपोच डिलिव्हरी, बंपर बक्षिसाची किंमत 5 कोटी.
कसा पहाल निकाल?
आज संध्याकाळी 5 च्या नंतर lottery.maharashtra.gov.in ला भेट द्या. लॉटरी निकालामध्ये 5PM Pdf File वर क्लिक करा. तेथे तुम्हांला महाराष्ट्र नाताळ न्यू ईयर भव्यतम लॉटरी निकाल पहायला मिळू शकतात. लॉटरी विक्रेत्या ऑथराईज्ड डिलरकडेही तुम्हांला निकालाची माहिती मिळू शकते.
महाराष्ट्र नाताळ न्यू ईयर भव्यतम लॉटरी 2021 सोडत अपडेट्स
लॉटरीचं नाव - महाराष्ट्र राज्य लॉटरी
स्कीमचं नाव - महाराष्ट्र नाताळ न्यू ईयर भव्यतम लॉटरी
ड्रॉ ची तारीख - 6 जानेवारी 2021
ड्रॉ ची वेळ - संध्याकाळी 5 च्या पुढे
अधिकृत संकेतस्थळ - lottery.maharashtra.gov.in
महाराष्ट्र राज्य लॉटरीकडून काही दैनंदिन लॉटरी सोडत देखील नियमित जाहीर केली जाते. त्याचे निकालदेखील तुम्हांला अधिकृत संकेतस्थळी नियमित अपडेट केल्यानंतर पहायला मिळणार आहेत.