Maharashtra Nagar Panchayat Election: राज्यातील 105 नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 21 डिसेंबरला मतदान, जाणून घ्या मतमोजणीची तारीख
राज्यातील नगरपंचायत निवडणुका ( Maharashtra Nagar Panchayat Election 2021 ) जाहीर झाल्या आहेत. राज्यातील विविध 32 जिल्ह्यांतील 105 नगरपिंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मुंबई येथे हा निर्णय जाहीर केला.
राज्यातील नगरपंचायत निवडणुका ( Maharashtra Nagar Panchayat Election 2021 ) जाहीर झाल्या आहेत. राज्यातील विविध 32 जिल्ह्यांतील 105 नगरपिंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मुंबई येथे हा निर्णय जाहीर केला. त्यानुसार नगरपंचायत निवडणुका पार पडत असलेल्या ठिकाणी आजपासून (24 नोव्हेंबर) आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान तर 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जाणून घ्या निवडणूक कार्यक्रम.
राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मुंबई येथे दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे.
उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा कालावधी- 1 ते 7 डिसेंबर (4 व 5 डिसेंबर या कालावधी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.)
उमेदवार अर्जांची छाननी- 8 डिसेंबर
मतदान - 21 डिसेंबर, सकाळी 7.30 ते सांयकाळी 5.30
मतमोजणी- 22 डिसेंबर, सकाळी 10 वाजलेपासून
(हेही वाचा, Vidhan Parishad Election 2021: विधान परिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक; जाणून घ्या कधी होणार मतदान व मतमोजणी)
सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे:
ठाणे- मुरबाड व शहापूर
पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा
रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित)
रत्नागिरी- मंडणगड, दापोली
सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ
पुणे- देहू (नवनिर्मित)
सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी
सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ
सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित),
नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा,
धुळे- साक्री, नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ,
अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी,
जळगाव- बोदवड,
औरंगाबाद- सोयगाव
जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित)
परभणी- पालम, बीड- केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ
उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु
नांदेड- नायगाव, अर्धापूर, माहूर
हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ, अमरावती- भातकुली, तिवसा
बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा
यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी
वाशीम- मानोरा, नागपूर- हिंगणा, कुही, वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर
भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर, गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, सावली
चंद्रपूर- पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, मुलचेरा
गडचिरोली- एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड.
पोटनिवडणूक कार्यक्रम
राज्यांतील वेगवेगळ्या जिल्ह्यातील 7 नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या रिक्त जागांसाठी देखील निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी 21 डिसेंबर रोजी मतदान पार पडेल. या नगरपंचायती/नगरपरिषदा पुढीलप्रमाणे:- शिरोळ (6 अ), नागभीड (4 अ), जत (5 ब), सिल्लोड (12 अ), फुलंब्री (2आणि 8), वानाडोंगरी ( 6अ) आणि ढाणकी (12 आणि 13) या नगरपरिषद व नगरपंचायतींतील सदस्यपदांच्या रिक्तपदांसाठी या पोटनिवडणुका पार पडणारआहेत. यासोबतच धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्त जागांसाठीही येत्या 21 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)