शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, पावसाळी अधिवेशनाला येतानाच अर्ध्या वाटेतुन माघारी

अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे ज्यामुळे त्यांंना पावसाळी अधिवेशनला येताना धरमतर खाडी पुलापर्यंत येउन पुन्हा मागे जावे लागले आहे

Shivsena MLA Mahendra Dalvi Coronavirus Positive (Photo Credits: Twitter)

आज पासुन महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) सुरुवात झाली आहे. या दोन दिवसीय अधिवेशनासाठी कानाकोपर्‍यातुन आमदार मुंबईत येत आहेत. याच वाटेत असताना शिवसेना आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांंना मात्र माघारी फिरावे लागले आहे.  अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे ज्यामुळे त्यांंना धरमतर खाडी पुलापर्यंत येउन पुन्हा मागे जावे लागले आहे. याविषयी दळवी यांंनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली आहे. आपल्याला कोरोनाची लक्षणे नाहीत मात्र खबरदारी म्हणुन आपण घरी क्वारंटाईन राहणार आहोत, डॉक्टरांंच्या सल्ल्यानुसार या परिस्थितीत काळजी घेणार आहोत असे त्यांंनी ट्विट मध्ये म्हंंटले आहे तसेच आपल्या संपर्कातील कार्यकर्त्यांना तपासणी करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण; घरामध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं पावसाळी अधिवेशन लांबणीवर पडले आहे, आजपासून दोन दिवस  घेण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेत या अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक आमदाराची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. यावरुनच काही वेळापुर्वी आमदारांंना विधीमंंडळात प्रवेश देण्यावरुन गोंंधळ झाला होता.

महेंद्र दळवी ट्विट

दरम्यान, पावसाळी अधिवेशनासाठी विधानभवनात जाताना आमदारांना मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज असे साहित्य दिले जाणार आहे. सध्या केवळ कोरोना चाचणी निगेटिव्ह असलेल्या आमदारांना सभागृहात प्रवेश दिला जात आहे. तसेच कोमॉर्बिडीटी (अन्यही आजार असणार्‍या) असलेल्या आमदारांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now