Maharashtra Monsoon Forecasts: रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात पुढील 2 दिवस अतिवृष्टीची शक्यता - हवामान खात्याचा अंदाज

मुंबईमध्येही शनिवार, रविवार पर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कोसळणार्‍या पावसामुळे मागील काही दिवसांपासून अनेक ठिकाणी धरणं, तलावं ओव्हर फ्लो होत आहेत. तसेच कोकण, पुणे, कोल्हापूर, नाशिक येथे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग भागामध्ये पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

कोकणामध्ये मागील महिन्याभरापासून दमदार पाऊस कोसळत आहे. जुलै महिन्यात जोरदार पावसामुळे तिवरे धरण फुटले होते. या धरणातील पाण्यात वाहून गेल्याने सुमारे 7 गावांचा संपर्क तुटला होता. काही दिवसांपासून कोकणातही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान जोरदार पावसामुळे मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक देखील बंद झाली होती.

ANI Tweet

काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईमध्येही शनिवार, रविवार पर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.