Maharashtra Monsoon Forecast: पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबईला रेड अलर्ट
पुढील 5 दिवसांसाठी मुंबईसह राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुढील 5 दिवसांसाठी मुंबईसह राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई (Mumbai), सातारा (Satara), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur) येथे अतिमुसळधार पाऊस होणार असून मराठवाड्यात देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर नागपूर (Nagpur), वर्धा (Wardha), अमरावती (Amravati), यवतमाळ (Yavatmal), वाशिम (Washim) आणि अकोला (Akola) जिल्ह्यातील मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पावसाचा जोर पाहता मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यापूर्वी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्याचबरोबर मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून समुद्रात जाताना सावधिगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच किनारी प्रदेशातील नागरिकांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला असून समुद्रकिनारी पर्यटकांनी गर्दी करु नये, असं सांगण्यात आलं आहे. (Mumbai Rains Update: आजही पावसाची शक्यता, मुंबईत यलो, नवी मुंबईत ऑरेंज अलर्ट)
पुढील 3 तासांत मुंबई, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथे मुसळधार पावसाचा अंदाज असल्याची माहिती के.एस. होसाळीकर यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
K.S. Hosalikar Tweets:
दरम्यान, सातत्याने कोसळणाऱ्या पावासामुळे मुंबईत जागोजागी पाणी साचले आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसंच मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.