Maharashtra Monsoon Forecast 2019: 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; तर आज मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता

तसेच येत्या 20 ते 22 सप्टेंबरपर्यंत पावसाचा हा जोर वाढवून मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही स्कायमेटने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तरी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे.

Monsoon (Photo Credits: Wiki common)

Monsoon 2019: मुंबईत सध्या पावसाचा जोर कमी असला तरीही पावसाची संततधार मात्र सुरु आहे. पुढील 24 तासांत मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता खाजगी हवामान अंदाज वर्तविणारी संस्था स्कायमेटने (Skymet) वर्तविली आहे. तसेच येत्या 20 ते 22 सप्टेंबरपर्यंत पावसाचा हा जोर वाढवून मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही स्कायमेटने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तरी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. मागील 2-3 दिवसापासून पावसाची संततधार सुरु असल्याने मुंबईकरही त्रस्त झाले आहे.

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे. त्यामुळे मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

स्कायमेट चे ट्विट:

मात्र पुढील 24 तासांत मुंबईत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असून पुण्यातही पावसाच्या हलक्या सरी बरसतील. त्याचबरोबर नागपूरमध्येही मध्यम स्वरुपाच्या सरी बरसू शकतात.

हेही वाचा- Mumbai Rain Record: मुंबईतील पावसाने मोडला 65 वर्षातला विक्रम, आतापर्यंत झाली 3453 मिमी पावसाची नोंद

नुकतीच मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून सादर केलेल्या अहवालामध्ये यंदाच्या मुंबईतील पावसाने 65 वर्षाचा रेकॉर्डब्रेक करत जुलै ते 15 सप्टेंबरपर्यंत 3453 मिमी पावसाची नोंद झाली आहे. असाच रेकॉर्ड 1954 मध्ये पडलेल्या पावसाने केला होता. ज्यावेळी जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत 3452 मिमी इतका पाऊस पडला होता. मात्र यंदाचा पाऊस हा 1954 मध्ये पडलेल्या सरासरी पावसापेक्षा जास्त आहे.