Maharashtra Monsoon Forecast 15th August: मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता तर मुंबईत मध्यम स्वरुपाचा पाऊस
पश्चिम आणि उत्तर पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा तयार झालेल्याचा परिणाम पश्चिम किनारपट्टीवर कमी होईल असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे.
मुंबईसह मुंबईजवळील ब-याच भागात पावसाचा जोर ओसरला असून काही ठिकाणी कमाल तापमानात थोडी वाढ झाल्याचे हवामापन खात्याच्या अंदाजानुसार दिसत आहे. तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोव्यात येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पश्चिम आणि उत्तर पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा तयार झालेल्याचा परिणाम पश्चिम किनारपट्टीवर कमी होईल असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे.
गेल्या 24 तासांत पुणे (Pune), सातारा (Satara) आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यांत हलक्या सरी बरसल्या. तर आज महाबळेश्वर (Mahabaleshwar) आणि कोल्हापूर (Kolhapur) येथे थोड्या फार प्रमाणात मुसळधार सरींची शक्यता आहे.
स्कायमेटचे ट्विट:
सांगली व सातारा येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आज हलक्या ते मध्यम सरी पुणे शहरावर बरसतील.
मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा येथे पाऊस काही दिवसांपूर्वी सारखा तीव्र होणार नाही. तथापि, कृष्णा खोऱ्यांतील धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने, येत्या पावसामुळे पूर निर्माण होऊ शकेल आणि परिस्थिती आणखी बिकट होईल. मुसळधार पावसाची जरी शक्यता नसली तरीही आधीचे पूराचे पाणी पूर्णपणे न ओसरल्याने तसेच जवळपास सर्वच धरणे पूरस्थिती निर्माण होऊ शकते, त्या दृष्टीने सावधगिरी बाळगण्याचे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.
महाराष्ट्रातील गेल्या दहा वर्षांमधील आॉगस्ट महिन्यापर्यंतची पावसाची आकडेवारी लक्षात घेता महापुराचा फटका बसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा 64 टक्के अतिरिक्त तर सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा 53 टक्के अतिरिक्त पाऊस झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पावसाच्या या रौद्र रुपाने या भागातील नागरिकांचे न केवळ संसार उघड्यावर पाडले तर जीवितहानी आणि वित्तहानीदेखील केली.