Maharashtra Monsoon 2020 Forecast: मुंबई सह कोकण किनारपट्टी वर पुढील 24 - 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रामध्ये मुंबई सह कोकण किनारपट्टीवर येत्या 24 ते 48 तासांमध्ये मुसळाधार पाऊस बरसण्याची शक्यता आज (12 ऑगस्ट) मुंबई हवामान वेधशाळेने वर्तवली आहे.

Mumbai Rains | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

महाराष्ट्रामध्ये मुंबई सह कोकण किनारपट्टीवर येत्या 24 ते 48 तासांमध्ये मुसळाधार पाऊस बरसण्याची शक्यता आज (12 ऑगस्ट) मुंबई हवामान वेधशाळेने वर्तवली आहे. दरम्यान रडार इमेजच्या स्थितीनुसार कोकणामध्ये, महाराष्ट्राच्या घाट परिसरात प्रामुख्याने उत्तर दिशेला अति जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकणात सध्या ढगांची चादर आहे. त्यामुळे येथे पाऊस बरसण्यास पोषक वातावरण असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई मध्ये मागील 24 तासांत काही भागांत जोरदार पाऊस झाला आहे. नोर्थ वेस्ट भागातील उपनगरांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याची माहिती मुंबई हवामान वेधशाळेचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी दिली आहे.

महाराष्ट्र हवामान अंदाज 2020

मुंबई सअह कोकणात, सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरात मागील आठवड्यामध्ये जोरदार पाऊस झाला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. तर कोल्हापुरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे तर राजाराम धरण देखील ओव्हर फ्लो झाले होते. कोकणातही अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत.