Maharashtra Monsoon 2020 Forecast: महाराष्ट्रात 12, 13 जुलै पासून पुन्हा दमदार पावसाची शक्यता; वेधशाळेचा अंदाज
त्यांच्या माहितीनुसार, दक्षिण कोकणामध्ये जोरदार पावसाच्या धारा कायम असतील.
मुंबई शहराला मागील आठवड्यात विकेंडला धुव्वाधार पावसाने झोडपून काढल्यानंतर तो काही दिवस अधून मधूनच बरसत होता. दरम्यान भारताच्या उत्तरेकडील दिशेला सरकलेला मान्सून आता महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा हजेरी लावण्याची शक्यता आहे. IMD GFS मोडेल अनुसार, 12,13 जुलै पासून परत एकदा राज्यात चांगल्या पावसाची शक्यता असल्याची माहिती मुंबई हवामान वेधशाळेचे के एस होसळीकर यांनी दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, दक्षिण कोकणामध्ये जोरदार पावसाच्या धारा कायम असतील. दरम्यान आतल्या काही भागांमध्ये मध्यम ते जास्त पाऊस बरसण्याची शक्यता आहे. विदर्भातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
K S Hosalikar Tweet
दरम्यान यंदा कोकणात दमदार पावसाची मालिका सुरू आहे. काल कशेडी घाटामध्येही दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. तसेच अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहे. खेड येथे जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर पोहचली होती. या ठिकाणी धोक्याची पातळी 7 मीटर इतकी असताना दोन दिवसांपूर्वी पाण्याचा प्रवाह 7.5 मीटर उंचीने वाहत होता.
विदर्भातील पावसाचा अंदाज
महाराष्ट्रामध्ये यंदा सरासरी पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार शेतकर्यांनी देखील आपल्या कामांना सुरूवात केली आहे. दरम्यान यंदा राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर असल्याने पावसाचा आनंद लुटण्यासाठी रस्त्यावर येऊ नका. विनाकारण भिजु नका असे देखील आवाहन करण्यात आले आहे.