Maharashtra Monsoon 2019: हवामान विभागाकडून समुद्र भरती काळात सतर्कतेचा इशारा; मुसळधार पावसाचे मुंबईकरांवरील संकट कायम

वेगवान वारे आणि मुसळधार पावसासह मुंबई समुद्रात भरती येईल असे हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे.

High Tide in Mumbai | Representational Image | (Photo Credits: PTI)

Mumbai Monsoon 2019: महाराष्ट्र आणि मुंबई शहरासह उपनगरांत सुरु असलेली पावसाची संततधार आजही (रविवार, 4 ऑगस्ट 2019) कायम आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई शहर, उपनगरांत नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली आहे. मध्य रेल्वे (Central Railway Mumbai) आणि हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गावरीस वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. तर, रस्तेमार्गांवरही पाणी साचल्यामुळे रस्तेवाहतूकही कोलमडली आहे. असे असतानाच हवामान विभागानेही येत्या काही तासात समुद्र भरती (High Tide) येणार असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वेगवान वारे आणि मुसळधार पावसासह मुंबई समुद्रात भरती येईल असे हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे.

मुंबई शहर उपनगरांत सध्या काय स्थिती

मुंबई शहरात सकल भागात पाणी साचले. चुनाभट्टी येथे रुळावर साचले पाणी. हार्बर सेवा विस्कळीत. ठाणे, कर्जत, बदलापूर,कल्याणमध्येही पावसाची संततधार कायम. बोरघाटात दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वेमार्ग वाहतूक ठप्प. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकलसेवा पूर्णपणे सुरू असल्याची मध्य रेल्वेची ट्विटरवरून माहिती. परंतू, प्रत्यक्षात रेल्वे ठप्प. प्रवाशांची फलटांवर गर्दी.

एएनआय ट्विट

मेगाब्लॉक रद्द, तरीही रेल्वे ठप्प

मुंबई रेल्वेकडून शक्यतो प्रत्येक रविवारी घेतला जाणारा मेगाब्लॉक आज रद्द करण्यात आला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक रद्द केला असला तरी, रेल्वे सेवा मात्र ठप्पच आहे. मेगाब्लॉक काळात रेल्वे सेवा अत्यंत मंद गतीने सरु असते. नेहमीच्या तूलनेत दैनंदिन वेळापत्रानुसार रेल्वे धावत नाहीत. मात्र, आज मेगाब्लॉक रद्द करुनही रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. ठाणे, कळवा, सायन, अशा अनेक रेल्वे स्टेशनवर पावसामुळे पाणीच पाणी साचले आहे. हे पाणीच रेल्वे सेवा ठप्प होण्यास कारण ठरले आहे. (हेही वाचा, Maharashtra Monsoon 2019: मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य-हार्बर रेल्वे सेवा ठप्प; सकल भागातही साचले पाणी)

मध्यरात्रीपासूनच पावसाने चांगाल जोर पकडला

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासूनच पावसाने चांगाल जोर पकडला. अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. दादर, माटुंगा, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, अंधेरी, विक्रोळी, घाटकोपर, कांजूरमार्ग परिसराने पावसाने अधिक जोर पकडला आहे. तर, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, ठाणे परिसरात रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी मोठ्या प्रमाणावर कोसळत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश स्थिती आहे. तर, पुणे, पिंपरी आणि नाशिकमध्येही दमदार पावसाने हजेरी लावली आहे.