Mumbai Rains Update: मुंबई सह उपगनरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात; पहिल्याच पावसात पाणी साचण्यास सुरुवात

उशिरा का असेना आज पावसाने मुंबई सह उपनगरात सकाळपासूनच जोर धरला.

Heavy Rainfall in Mumbai (Photo Credits: ANI)

Mumbai Monsoon 2019: नागरिकांची मान्सूनची प्रतिक्षा संपवत महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला. पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागात पावसाने जोर धरला असला तरी मुंबईत पाऊस अजूनही हवा तसा बरसला नाही. मात्र उशिरा का असेना आज पावसाने मुंबई सह उपनगरात सकाळपासूनच जोर धरला.

मुंबईतील वांद्रे, अंधेरी, मालाड बोरीवली परिसरात दमदार पावसाला सुरुवात झाली. विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द परिसरात जोरदार सरी कोसळत आहेत. पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. (Maharashtra Monsoon 2019 Live Updates: महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स येथे जाणून घ्या)

ANI ट्विट:

केवळ मुंबईतच नव्हे तर ठाणे, नवी मुंबईतही पावसाने हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस होत आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली यांच्यासह पालघर, विरार, वसईतही मुसळधार पाऊस होत आहे. तर नवी मुंबईतील वाशी, बेलापूर, जुईनगर, खारघर, पनवेल या भागातही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. उरणमध्ये देखील पावसाचे आगमन झाले आहे.