Maharashtra Monsoon 2019: गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, तर कोल्हापूरातील गगनबावडा-कोल्हापूर मार्ग वाहतूकीसाठी बंद
त्यामुळे या नदीकाठच्या गावांना प्रशासनाने खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरातही रात्रभर कोसळधार पाऊस सुरु असून कोल्हापूर गगनबावडा (GaganBawda) मार्गावर, मांडूकली गावाजवळ रस्त्यावर 1.5 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद केली आहे.
संपुर्ण महाराष्ट्रभर पावसाचे थैमान सुरु असून या मुसळधार पावसाचा तडाखा महाराष्ट्रातील ब-याच जिल्ह्यांना बसत आहे. यात नाशिक (Nashik), कोल्हापूर (Kolhapur), रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु असून या पावसाने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाशकात गोदावरी (Godavari) नदीला पूर आला असून या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या नदीकाठच्या गावांना प्रशासनाने खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरातही रात्रभर कोसळधार पाऊस सुरु असून कोल्हापूर गगनबावडा (GaganBawda) मार्गावर, मांडूकली गावाजवळ रस्त्यावर 1.5 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद केली आहे.
नाशकात सुरु असलेल्या धुव्वाधार पावसाने गोदावरी नदीचे पाणी रस्त्यावर आले असून बरीच मंदिरे पाण्यात बुडाली आहेत. तेथील परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सतर्कतेचा इशारा म्हणून खबरदारी घेण्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा- Mumbai Rains Forecast: मुंबई मध्ये अतिवृष्टीची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
तर दुसरीकडे कोल्हापूरातील मुसळधार पावसामुळे गगनबावडा-कोल्हापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, ही वाहतूक फोंडा घाटमार्गे वळविण्यात आली आहे. कळे मार्गे येवून गगनबावडा जाणारी वाहतूक, तसेच कोल्हापूर कडून जाणारी वाहतूक थांबविली आहे. वैभववाडी कडून येणारी वाहतूक गगनबावडा येथे थांबविण्याचा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.