मुंबई: पाऊस, समुद्र भरतीमुळे अपत्कालीन स्थिती उद्भवल्यास BMC कडे संपर्क साधा ; करा 1996 आणि 101 या टोल फ्री क्रमांवर कॉल
तर, किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचे अवाहन केले आहे. दरम्यान, राज्यभरातील अनेक ठिकाणी समाधानकारक म्हणावा असा पाऊस पडत असला तरी, राज्यातील काही भाग मात्र अद्यापही कोरडाठाक आहे.
Maharashtra Monsoon 2019: मुंबई शहर (Mumbai City) आणि उपनगरांमध्ये गेल्या काही तासात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेला मुसळधार पावसाचा इशारा आणि त्यानंतर वाढलेला पावसाचा जोर पाहून मुंबई महापालिका (BMC) सतर्क झाली आहे. सतर्कतेचा भाग म्हणून मुंबई महापालिकेने मुंबई समुद्र किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचे अवाहन केले आहे. तसेच, सुरक्षेसंबंधी ट्विटरच्या माध्यमातून मार्गदर्शनही केले आहे. अपत्कालीन स्थिती उद्भवली तर, मदत मागण्यासाठी महापालिकेने नागरिकांना टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन दिले आहेत.
काय म्हटले आहे महापालिकेने?
पाऊस, सुरु असताना किंवा भरती काळात समुद्राच्या पाण्यात उतरु नका.
पुढील काही तासात समुद्राला भरती येणार आहे. या भरतीवेळी समुद्रात 4.90 मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळू शकतात. तेव्हा काळजी घ्या.
आजची समुद्रातील भरती ही धोकादायक असू शकते. त्यामुळे जर काही अपत्कालीन स्थिती उद्भवली आणि आपल्याला मदतीची गरज असल्यास 1996 आणि 101 या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधा.
बीएमसी ट्विट
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासूनच पावसाने चांगाल जोर पकडला. अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. दादर, माटुंगा, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, अंधेरी, विक्रोळी, घाटकोपर, कांजूरमार्ग परिसराने पावसाने अधिक जोर पकडला आहे. तर, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, ठाणे परिसरात रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी मोठ्या प्रमाणावर कोसळत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश स्थिती आहे. तर, पुणे, पिंपरी आणि नाशिकमध्येही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. (मुंबईतील पावसाची खबरबात जाणूण घेण्यासाठा क्लिक करा)
बीएमसी ट्विट
हवामान खात्याने येत्या काही तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचे अवाहन केले आहे. दरम्यान, राज्यभरातील अनेक ठिकाणी समाधानकारक म्हणावा असा पाऊस पडत असला तरी, राज्यातील काही भाग मात्र अद्यापही कोरडाठाक आहे. त्यामुळे एका बाजूला मुसळधार पाऊस तर दुसऱ्या बाजूला दुष्काळसदृश्य स्थिती असे चित्र आहे.