शिपायाने सिगरेट दिली नाही म्हणून मॉडल झाली नग्न
अंधेरीमध्ये राहणाऱ्या एका मॉडलने शिपायाने सिगरेट दिली नाही म्हणून चक्क इमारतीच्या लिफ्टमध्ये नग्न होऊन तमाशा केल्याची घटना घडली आहे.
अंधेरीमध्ये राहणाऱ्या एका मॉडलने शिपायाने सिगरेट दिली नाही म्हणून चक्क इमारतीच्या लिफ्टमध्ये नग्न होऊन तमाशा केल्याची घटना घडली आहे. तसेच रात्रीच्या वेळेस दारुच्या नशेत या मॉडेलने धिंगाणा घातल्याचे समोर आले आहे.
ओशिवरा येथील एका इमारतीत राहणाऱ्या एका मॉडेलची बिल्डींगच्या शिपायासोबत सिगरेट वरुन भांडण झाले. त्यावरुन ही मॉडेल त्याला खूप शिवीगाळ करत लिफ्टमध्ये शिरली आणि तिने अचानक अंगावरील कपडे काढून टाकले. यावेळी बिल्डिंगमध्ये जमा झालेल्या लोकांनी या मॉडेलचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर #MeToo लिहून व्हायरल केला. तसेच या प्रकरणाची माहिती तेथील स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून या मॉडेलला समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
मात्र या मॉडेलने पोलिसांचेसुद्धा ऐकले नाही उलट त्यांच्यासोबत ही वाद घातला. तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी मॉडेलच्या या वागणूकीला विरोध केला आहे.