Maharashtra MLC Election 2021: विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर, सतेज पाटील यांच्यासह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

मात्र, सोलापूर आणि अहमदनगर या दोन जागा वगळून इतर जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागा रिक्त होत आहेत.

Maharashtra Legislature | (File Photo)

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक (Maharashtra MLC Election 2021) कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबईतील 2, कोल्हापूर (Kolhapur), धुळे (Dhule ), नंदुरबार (Nandurbar), अकोला, (Akola ) बुलडाणा (Buldana), वाशिम (Washim) , नागपूर (Nagpur), या 6 जागांसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. विधानपरिषदेच्या 8 जागांचा कार्यकाळ अल्पावधीतच संपुष्ठात येत आहे. मात्र, सोलापूर आणि अहमदनगर या दोन जागा वगळून इतर जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागा रिक्त होत आहेत.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुकीची अधिसूचना 16 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. अर्जांची छाननी, अर्ज मागे घेण्याची मूदत अनुक्रमे 23 आणि 24 नोव्हेबर असेल. तर मतदान 10 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 4 या वेळीत होईल. झालेल्या मतदानाची मतमोजणी ही 14 डिसेंबर रोजी होईल. 16 नव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. (हेही वाचा, Election of President of India: भारताचे राष्ट्रपती कसे निवडले जातात? जाणून घ्या निवडणूक प्रक्रिया, मतदान पद्धती आणि निवड)

विधानपरिषदील कार्यकाळ संपत असलेले आमदार (स्थानिक स्वराज्य संस्था) 

विधानपरिषदेच्या 6 जागांवरील आपापले उमेदवार निवडूण आणण्यासाठी महाविकासआघाडी आणि विरोधात असलेल्या भाजपचा चांगलाच कस लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही निवडणूक सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन बिनविरोध करणार की परस्परांविरोधात उमेदवार उभे करत थेट निवडणूक लढवणार याबाबत उत्सुकता आहे. रामदास कदम यांना शिवसेना पुन्हा संधी देणार की मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन नवा उमेदवार देणार याबाबत उत्सुकता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif