Maharashtra MLC Election 2020: पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकासआघाडी, भाजपमध्ये बंडखोरीचे फटाके; पाहा कुठेकुठे बंडाचा झेंडा

त्यामुळे 'बंडखोरांना आवारा' असे म्हणायची वेळ शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासह विरोधकांवरही आली आहे. पाहा कोणकोणत्या ठिकाणी झाली बंडखोरी.

Maharashtra Legislature | (Archived images)

Graduates, Teachers Constituency Elections 2020: पुणे (Pune) पदवीधर मतदार संघ (Graduate Constituency) आणि अमरावती (Amaravati) शिक्षक मतदारसंघ आणि औरंगाबाद, (Aurangabad) नागपूर, (Nagpur) पुणे (Pune) पदवीधर मतदार संघ साठी (Teacher constituency) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. महत्त्वाचे असे की, इच्छुक अधिक आणि जागा कमी ही नेहमीप्रमाणेच निर्माण होणारी स्थिती पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2020 मध्ये याही वेळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकासआघाडी आणि 'शिस्तप्रियत पक्ष' असल्याचा दावा करणाऱ्या भाजपमध्येही बंडखोरीचे फटाके फुटत आहेत. त्यामुळे 'बंडखोरांना आवारा' असे म्हणायची वेळ शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासह विरोधकांवरही आली आहे. पाहा कोणकोणत्या ठिकाणी झाली बंडखोरी.

पुणे पदवीधर मतदरासंघ उमेदवार (अधिकृत)

राष्ट्रवादी काँग्रेस- अरुण लाड

भाजप- संग्रामसिंह देशमुख

वंचित बहुजन आघाडी- प्रा. सोमनाथ साळुंखे

जनता दल- शरद पाटील

मनसे- रुपाली ठोंबरे

आम आदमी पक्ष- डॉ. अमोल पवार

उत्तम पवार (पदवीधर कल्याण मंडळ)

रयत क्रांती - एन डी चौगुले (N D Chaugule)

अपक्ष- अभिजीत बिचुकले

अपक्ष- श्रीमंत कोकाटे

पुणे बंडखोर उमेदवार

प्रताप माने (राष्ट्रवादी)

रयत क्रांती - एन डी चौगुले (भाजप मित्रसंघटना)

हेदेखील वाचा- Maharashtra Mlc Election 2020: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आज शेवटचा दिवस

औरंगाबाद पदवीधर मतदासंघ उमेदवार (अधिकृत)

राष्ट्रवादी काँग्रेस- सतीश चव्हाण

भाजप- शिरीष बोराळकर

वंचित बहुजन आघाडी- नागोरराव पांचाळ

प्रहार संघटना- सचिन ढवळे (बच्चु कडू समर्थक)

औरंगाबाद पदवीधर मतदासंघ बंडखोर उमेदवार

रमेश पोकळे (भाजप)

प्रवीण घुगे (पंकजा मुंडे यांचे समर्थक- भाजप)

जयसिंगराव गायकवाड (भाजप)

सचिन ढवळे (महाविकासआघाडी घटक प्रहार संघटना-)

(हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020: महाराष्ट्र विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी सर्व पक्षांतील उमेदवारांची नावे जाहीर, येथे पाहा पूर्ण यादी)

नागपूर पदवीधर मतदासंघ उमेदवार (अधिकृत)

भाजप- संदीप जोशी

काँग्रेस- अभिजीत वंजारी

अपक्ष नितीन रोंघे (विदर्भवादी नेते)

वंचित बहुजन आघाडी- राहुल वानखेडे

पुणे शिक्षक मतदारसंघ उमेदवार (अधिकृत)

काँग्रेस- जंयत आसनगावकर

भाजप- अधिकृत उमेदवार नाही. डॉ. सुभाष जाधव एमफुक्टो कडून लढणार

वंचित बहुजन आघाडी- सम्राट शिंदे

अपक्ष- दत्तात्रय सावंत

अमरावती शिक्षक मतदारसंघ उमेदवार (अधिकृत)

श्रीकांत देशपांडे (शिक्षक आघाडी ) मविआ पाठिंबा

नितीन धांडे ( भाजप)

दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती)

संगीता शिंदे (शिक्षण संघर्ष समिती)

प्रकाश काळबांडे ( विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ)

पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आजची (12 नोव्हेंबर) शेवटची मुदत आहे. तर उद्या (13 नोव्हेंबर) अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस 17 नोव्हेंबर हा आहे. शिक्षक आणि पदवीधर अशा एकूण 5 मतदारसंघासाठी ही निवडणूक ( Maharashtra Mlc Election 2020) पार पडत आहे. या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर या दिवशी मतदान होणार आहे. विधानभवनात सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान पार पडेल. निवडणुकीची अधिसूचना 5 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली होती. औरंगाबाद, पुणे, नागपूर येथे पदवीधर आणि अमरावती, पुणे येथील शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक पार पडत आहे.