Maharashtra MLC Election 2020: महाराष्ट्र विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी सर्व पक्षांतील उमेदवारांची नावे जाहीर, येथे पाहा पूर्ण यादी

तसेच उद्या (13 नोव्हेंबर) अर्जाची छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर आहे.पाहूयात सर्व पक्षातील आतापर्यंत समोर आलेल्या उमेदवारांची नावे.

Vidhan Sabha | Photo Credits: Twitter

Maharashtra MLC Election 2020: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी यंदा 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले असून कोणता नेता कोणाला टक्कर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान ब-याच पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली असून काही पक्ष अजून उमेदवारांच्या नावांबाबत संभ्रम स्थितीत आहे. भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ने आपले उमेदवार जाहीर केले असून आज राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीकडून उभे राहिलेल्या उमेदवारांची नावे घोषित केली.

आज या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तसेच उद्या (13 नोव्हेंबर) अर्जाची छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर आहे.पाहूयात सर्व पक्षातील आतापर्यंत समोर आलेल्या उमेदवारांची नावे.

पुणे पदवीधर मतदारसंघ

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ

सतीश चव्हाण (राष्ट्रवादी )

नागोरराव पांचाळ( वंचित)

शिरीष बोराळकर (भाजप)

रमेश पोकळे (भाजप बंडखोर)

नागपूर पदवीधर मतदारसंघ

अभिजीत वंजारी (कॉग्रेस )

नितीन रोंघे ( विदर्भवादी उमेदवार )

संदीप जोशी( भाजप)

राहुल वानखेडे ( वंचित बहुजन आघाडी )

पुणे शिक्षक

जयंत आसनगावकर ( काँग्रेस)

दत्तात्रय सावंत (अपक्ष)

सम्राट शिंदे (वंचित)

डॉ.सुभाष जाधव (एमफुक्टो)

अमरावती शिक्षक

श्रीकांत देशपांडे (शिक्षक आघाडी )

मविआ पाठिंबा नितीन धांडे ( भाजप)

दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती)

संगीता शिंदे (शिक्षण संघर्ष समिती)

प्रकाश काळबांडे ( विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ)

हेदेखील वाचा- Maharashtra Mlc Election 2020: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आज शेवटचा दिवस

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडण्यात आलेले उमेदवार नक्कीच विजयी होतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

ही निवडणूक 1 डिसेंबर या दिवशी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत विधानभवनात मतदान पार पडेल. निवडणुकीची अधिसूचना 5 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली होती. औरंगाबाद, पुणे, नागपूर येथे पदवीधर आणि अमरावती, पुणे येथील शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक पार पडत आहे.