Ladies Special Bus: महिलांकरीता विशेष बस सेवा उपलब्ध करावी, मंंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांंच्याकडे मागणी

यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे.

Crowded BEST Bus (Image For Representation, Photo Credits: Youtube)

Yashomati Thakur Demand Ladies Special Bus: मुंबईमध्ये शासकीय, निमशासकीय आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे, अशावेळी महिलांसाठी सुद्धा विशेष बस सेवा तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या प्रवासाकरिता अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे. यशोमती ठाकुर यांंनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे यासंदर्भात मागणी केली आहे. Mumbai Local: मुंंबई लोकल ट्रेन लवकर सुरु करा, संतप्त प्रवाशांचं विरार मध्ये आंदोलन (Watch Video)

प्राप्त माहितीनुसार, संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सर्व अत्यावश्यक सेवेतील शासकीय, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी- कर्मचारी विशेषतः महिलांनाही कार्यालयात किंवा कर्तव्याच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. बसने प्रवास करण्याकरीता दररोज तास- दोन तास बसची प्रतीक्षा करावी लागते, पुढे पुन्हा दोन-तीन तास प्रवास करावा लागतो. बसची संख्या सुद्धा कमी असल्याने एका बसमध्ये परवानगी पेक्षा अधिक गर्दी होते, अशा परिस्थितीत वेळ वाचवण्याच्या आणि एकुणच सोयीच्या दृष्टीने महिलांसाठी विशेष बस सेवा सुरु करावी असे त्यांंनी पत्रात नमुद केले आहे.

दरम्यान, केंद्र शासनाने रेल्वेने प्रवास करण्यासाठी क्यू-आर कोडसहित पासेसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र अजुनही, बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्यू- आर कोड पासेस उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे पर्यायाने त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बसने प्रवास करावा लागत आहे