MHADA: मुंबईकरांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण, गोरेगाव पश्चिम मोतीलालनगर येथे 'म्हाडा' राबवणार 40 हजार घरांचा प्रकल्प

हा प्रकल्प साधारण 142 एक इतक्या विस्तीर्ण भूखंडावर राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

MHADA Home | (Photo Credits-mhada)

हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. मुंबईकर आणि राज्यातील नागरिकांना स्वस्तात घर मिळावं यासाठी नेहमीच कार्यरत असणारे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (Maharashtra Housing and Area Development Authority) अर्थातच म्हाडा (MHADA) मुंबईकरांसाठी एक नवा पुनर्विकास प्रकल्प घेऊन येत आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने गोरेगाव पश्चिम (Goregaon West) मोतीलाल नगर (Motilal Nagar) म्हाडा मार्फत हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पात सुमारे 40 हजार घरं नागरिकांसाठी उपलब्ध होतील. तसेच, मुंबईत घरांच्या वाढत्या किमतीही काही प्रमाणात घटतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मुंबईतील नागरिकांपुढे असलेली गृहसाठ्याची कमतरताही या प्रकल्पामुळे भरून निघण्याची बरीच शक्यता आहे. हा प्रकल्प साधारण 142 एक इतक्या विस्तीर्ण भूखंडावर राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एक छोटेसे शहरच वसविण्याचा म्हाडाचा विचार असून, या आराखड्याचाच एक भाग म्हणून प्रोजेक्ट सल्लागार समितीकडून (पीएमसी) या भागात सर्वेक्षण सुरू असल्याचे वृत्त आहे. प्रकल्पासाठी पीएमसी म्हणून पी. के. दास असोसिएसटची निवड करण्यात आली आहे. असोसिएशटकडून मोतीलानगरमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. त्याचा अंतिम अहवाल ऑगस्टपर्यंत सादर होणे अपेक्षीत आहे, अशी माहिती म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी दिली आहे. (हेही वाचा, MHADA Nashik Board Lottery 2019: नाशिक मधील म्हाडा च्या 1126 घरांसाठी विजेते आणि प्रतिक्षेत असणाऱ्या भाग्यवंतांची यादी lottery.mhada.gov.in वर जाहीर)

प्रकल्प वैशिष्ठ्ये आणि उद्देश

उद्देश

वैशिष्ट्य

आर्थिक गणित

कसा राबवणार प्रकल्प?

मुंबई आणि राज्यभरातील विविध प्रादेशिक विभागांतील नागरिकांसाठी म्हाडा हे एक वरदान ठरले आहे. सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर दरात आवश्यक सोईसुविधांनी युक्त असे घर उपलब्ध करुन देण्याचा म्हाडाचा नेहमीच प्रयत्न असतो. आजवर अशा हजारो कुटुंबीयांना म्हाडाने त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध करुन दिले आहे.