Maharashtra Lottery Results Today: महाराष्ट्र सागरलक्ष्मी, महाराष्ट्र गजलक्ष्मी सोम साप्ताहिक लॉटरी,महाराष्ट्र गणेशलक्ष्मी भाग्यशाली साप्ताहिक लॉटरी, महाराष्ट्र सह्याद्री धनलक्ष्मी साप्ताहिक लॉटरीचे निकाल पहा lottery.maharashtra.gov.in वर
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल नियमित lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दररोज संध्याकाळी जाहीर केला जातो.
महाराष्ट्र सागरलक्ष्मी साप्ताहिक लॉटरी ( Maharashtra Sagarlakshmi Saptahik Lottery)
महाराष्ट्र गजलक्ष्मी सोम साप्ताहिक लॉटरी(Maharashtra Gajalakshmi Saptahik Lottery)
महाराष्ट्र गणेशलक्ष्मी भाग्यशाली साप्ताहिक लॉटरी(Maharashtra Ganesh Lakshmi Bhayshali Saptahik Lottery) महाराष्ट्र सह्याद्री धनलक्ष्मी साप्ताहिक लॉटरी (Maharashtra Sahyadri Dhanalakshmi Saptahik Lottery) या चार लॉटरीचे निकाल
महाराष्ट्र राज्य लॉटरीमध्ये सोमवारी जाहीर केले जातात. यामध्ये दर आठवड्याला 6 साप्ताहिक आणि 4 मिनी लॉटरीची सोडत जाहीर केली जाते. महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल नियमित lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दररोज संध्याकाळी जाहीर केला जातो. 4.15 ते 5 दरम्यान या चारही लॉटरीचे निकाल जाहीर होतील आणि नंतर ते वेबसाईट वर अपडेट केले जातात.
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?
lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा.
यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा.
पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.
विजेत्याला रक्कम मिळवण्यासाठी काही नियम पाळणं आवश्यक आहे. तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता, तसेच Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल.यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर, Pan Card Number, Aadhar Card Number ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 Witness त्यांचा पत्ता, मोबाइल नंबर, Pan Card Xerox, Aadhar Card Xerox ही कागदपत्र स्वाक्षरी करून देणं आवश्यक आहेत.
दरम्यान रु १०,००० /- पर्यंतचे बक्षीस ज्या विक्रेत्याकडून तिकीट घेतले त्याच्याकडून घेता येऊ शकते. रु १०,००० /- पेक्षा जास्त रकमेच्या बक्षीसाची मागणी उपसंचालक(वि व ले), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी नवी मुंबई, यांच्याकडे करावी लागते. सोडतीच्या दिनांकानंतर ९० दिवसांत मूळ तिकिटासह बक्षिसाची मागणी करणे बंधनकारक आहे. तर सोडतीचे अधिकृत निकाल अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध तसेच निवडक वर्तमानपत्रात प्रसिध्द होतात. अर्जपत्रिका, अटी व शर्ती डाऊनलोड करण्यासाठी http://lottery.maharashtra.gov.in येथे भेट द्यावी किंवा ०२२-२७८४६७२० किंवा ०२२-२७८४५४८१ येथे फोन करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.