Maharashtra Lottery Results: गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये अक्षय लॉटरीचे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. तर उर्वरीत महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री वीजयालक्ष्मी लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत. महा. गजलक्ष्मी बुध ची 5 बक्षिसे 10 हजारांची असणार आहेत.
Maharashtra Lottery Results: अक्षय (Akshay),महा. गजलक्ष्मी बुध (Maha Gajalakshmi Budh), गणेशलक्ष्मी वीजयी (Ganeshlakshmi Vijayi), महा. सह्याद्री विजयालक्ष्मी (Maha. Sahyadri Vijayalakshmi) लॉटरींची सोडत आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी जाहीर केला जातो. त्यानंतर दर 15 मिनिटांनी प्रत्येक लॉटरीचा निकाल जाहीर होतो. त्यामुळे जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, या संकेतस्थळावर तुम्ही खरेदी केलेली लॉरटी चेक करू शकता. महाराष्ट्र शासन तीन राष्ट्रीय सुटीचे दिवस वगळून साप्ताहिक सर्व दिवशी सोडती आयोजित करते.
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?
lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा.
यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा.
पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.
प्रत्येक आठवडयात एकूण 27 सोडती, तसेच 4 मासिक सोडती व वर्षाला 6 भव्यतम सोडत असतात. यामुळे प्रत्येक महिन्याला 30 व्यक्ती लखपती होऊ शकतात. जर तुम्ही विजेते असाल तर तुम्हाला बक्षिस मिळण्यासाठी काही गोष्टींची माहिती असणे महत्त्वाचे आहे. लॉटरींचे बक्षिस मिळण्यासाठी काही कागदपत्रांची गरज असते. तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करावा. त्याशिवाय, Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरा. यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर,पॅन कार्ड, आधार कार्ड, ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 साक्षीदारांची माहिती देणं आवश्यक आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 25, 2024 02:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

