Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

सुरुवातीच्या काळात लॉटरी तीन महिने, दोन महिने किंबहूनान आठवड्यातून एकचदा निघायची. परंतु आता लॉटरीचे नंबर रोज निघतात. आजकाल लॉटरीच्या दुकानावर पाहिले तर तेथील गर्दी पाहून लक्षात येते की हा व्यवसाय खूप वाढला आहे.

Photo Credit- X

Maharashtra Lottery Results: अक्षय (Akshay),महा. गजलक्ष्मी बुध (Maha Gajalakshmi Budh), गणेशलक्ष्मी वीजयी (Ganeshlakshmi Vijayi), महा. सह्याद्री विजयालक्ष्मी (Maha. Sahyadri Vijayalakshmi) लॉटरींची सोडत आज बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी जाहीर केला जातो. त्यामुळे जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, या संकेतस्थळावर तुम्ही खरेदी केलेली लॉरटी ती चेक करू शकता. आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये अक्षय लॉटरीचे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. तर उर्वरीत महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री वीजयालक्ष्मी लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत. महा. गजलक्ष्मी बुध ची 5 बक्षिसे 10 हजारांची असणार आहेत.

आधीच्या काळात राज्यातील तरुणाई फार शिकलेली नव्हती. त्यामुळे मटका, जुगार ह्या व्यसनांच्या आहारी अनेक तरुण गेले होते. मटका, जुगार ह्या व्यसनांच्या नादी लागून अनेकांनी आपले घर, दागिने, संपत्ती गमावली होती. त्यांच्या या व्यसनाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना केली. राज्य सरकार स्थीपित लॉटरी असल्याने यात विश्वासहार्यता आली आणि फसवेगीरी दूर झाली. 12 एप्रिल 1969 स्थापना केल्यानंतर तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते. त्याशिवाय, लॉटरी अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठे बक्षीस जिंकून देते. त्यामधून नागरिक स्वत:ची स्वप्ने साकार करत आहेत. त्याशिवाय, लॉटरी विक्रीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सरकारकडून केला जातो. यात शिक्षण, आरोग्य सुधारणा, महिला व बाल विकासाचे मजबूतीकरण तसेच कृषि क्षेत्र आदींसाठी या पैशांचा वापर होतो.

महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?

  • lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
  • त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा.
  • यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा.
  • पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
  • या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.

राज्य शासनाकडून प्रत्येक आठवड्याला लॉटरींची सोडत आयोजित करण्यात येते. या लॉटरी सिस्टीममध्ये राज्य शासनाकडून प्रत्‍येक आठवडयात एकूण 27 सोडती, 4 मासिक सोडती व वर्षाला 6 भव्यतम सोडत केल्या जातात. ज्यामुळे प्रत्येक महिन्याला 30 लोक लखपती होऊ शकतात. राज्य सरकार संचालीत लॉटरीमुळे आत्तापर्यंत गेल्या 5 वर्षात 619 पेक्षा जास्त व्यक्ती लखपती झाले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now