Maharashtra- Gudipadwa Bumper Lottery Results 2024: महाराष्ट्र लॉटरी गुढीपाडवा सोडत प्रतिक्षा संपणार; lottery.maharashtra.gov.in वर पाहा निकाल

महाराष्ट्र लॉटरी मंडळाने सोडतीचे ठिकाण जाहीर केले आहे.

Maharashtra Lottery | | (Photo credit: archived, edited, representative image)

यंदाच्या वर्षीचा महाराष्ट्र लॉटरी गुढीपाडवा बंपर निकाल (Maharashtra Gudipadwa  Bumper Lottery Results 2024) आज जाहीर होणार आहे. आपणही लॉटरीचे शौकीन असाल किंवा लॉटरीचे तिकीट खरेदी केले असेल तर आपल्यासाठी आवश्यक माहिती येथे मिळू शकते. गुढीपाडवा बंपर लॉटरी निकाल (Gudi Padwa Bumper Lottery Result Date) आज दुपारी 4.00 वाजता अधिकृतपणे ऑनलाईन माध्यमातून जाहीर होणार आहे. महाराष्ट्र लॉटरी मंडळाने सोडतीचे ठिकाण जाहीर केले आहे. प्राप्त माहितीनुसार, नवी मुंबई येथील वाशी येथे महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे सोडत सभागृहात गुढीपाडवा बंबर लॉटरीची सोडत होणार आहे. यामध्ये पहिले सामायिक बक्षीस 1 करोड रूपयांचे आहे. या लॉटरीची एकूण 19, 290 बक्षीसं असून त्यांची किंमत 1,74,00,000 आहे.

दरम्यान, अधिक माहितीसाठी आपण https://lottery.maharashtra.gov.in/mhlotteryresults.aspx  या संकेथस्थळाला भेट देऊ शकता. तसेच लॉटरी तिकीट विजेते येथूनच महाराष्ट्र गुढीपाडवा बम्पर 2024 निकाल डाउनलोड करू शकतात. महाराष्ट्र राज्य लॉटरी गुढीपाडवा बम्पर निकाल 2024 च्या तिकीट विजेत्यांची नावे आणि डाउनलोड प्रक्रिया इत्यादींबाबत अधिक माहिती या संकेतस्थळावर नमूद केली जाते. (हेही वाचा, Maharashtra Gudi Padwa Bumper Lottery Result 2024: महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम सोडत 12 एप्रिलला; पहा कधी, कुठे जाहीर होणार निकाल?)

महाराष्ट्र लॉटरी संदर्भात अधिक माहिती आणि तपशील

Gudipadwa Bumper Lottery Results- बक्षिसांची रक्कम मिळवण्यासाठी काही नियम आहेत. त्यानुसार 10,000/- रुपयांपर्यंतचे बक्षीस ज्या विक्रेत्याकडून तिकीट घेतले त्याच्याकडून घेता येते. रुपये 10,000/- पेक्षा अधिक रकमेच्या बक्षीसाची मागणी उपसंचालक(वि व ले), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी नवी मुंबई, यांच्याकडे करावी. सोडतीच्या दिनांकानंतर 90 दिवसांत मूळ तिकिटासह बक्षिसाची मागणी करणे बंधनकारक आहे. सोडतीचे अधिकृत निकाल अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध तसेच निवडक वर्तमानपत्रात प्रसिध्द होतात. अर्जपत्रिका, अटी व शर्ती डाऊनलोड करण्‍यासाठी http://lottery.maharashtra.gov.in येथे भेट द्यावी किंवा ०२२-२७८४६७२० किंवा ०२२-२७८४५४८१ येथे फोन करावा. बक्षीस विजेत्यांना बक्षिसांची मागणी सादर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी- मागणी पत्राचा नमुना, प्रतिज्ञापत्र, क्षतिपूर्ती बंधपत्र व अनुमती. बँकेचे तपशील इत्यादी.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif