Maharashtra Lottery Akarshak Pushkaraj Result: 'महाराष्ट्र राज्य लॉटरी' मध्ये आज 'आकर्षक पुष्कराज सोडत' होणार जाहीर; lottery.maharashtra.gov.in वर असा पहा निकाल

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या (Maharashtra State Lottery) माध्यमातून दर गुरूवारी आकर्षक पुष्पराज लॉटरी (Akarshak Pushkaraj Lottery) जाहीर केली जाते. सुमारे 11 लाख रूपयांचे पहिले आणि सर्वाधिक रक्कमेचे बक्षीस दर गुरूवारी जिंकण्याची शक्यता असते.

Maharashtra Lottery Akarshak Pushkaraj Result: 'महाराष्ट्र राज्य लॉटरी' मध्ये आज 'आकर्षक पुष्कराज सोडत' होणार जाहीर; lottery.maharashtra.gov.in वर असा पहा निकाल
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Maharashtra Rajya Lottery Result: महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या (Maharashtra State Lottery) माध्यमातून दर गुरूवारी आकर्षक पुष्कराज लॉटरी (Akarshak Pushkaraj Lottery) जाहीर केली जाते. सुमारे 11 लाख रूपयांचे पहिले आणि सर्वाधिक रक्कमेचे बक्षीस दर गुरूवारी जिंकण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकजण या 'पुष्कराज लॉटरी'मध्ये आपलं नशीब आजमवत असतात. आज संध्याकाळी या लॉटरीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे तुम्हीदेखील आज महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या 'आकर्षक पुष्कराज  लॉटरीचं' तिकीट काढलं असेल तर पहा तुम्ही का निकाल ऑनलाईन माध्यमातून कसा पाहू शकाल?

महाराष्ट्र राज्य लॉटरीचा निकाल ऑनलाईनप्रमाणेच ऑफलाईन माध्यमातून नियमित वर्तमानपत्रामध्येही जाहीर केला जातो. महाराष्ट्र राज्य लॉटरी रिझल्ट lottery.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर pdf फॉरमेट मध्ये जाहीर झाल्यानंतर तुम्ही तो डाऊनलोड करून पाहू शकाल.

महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?

  • lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
  • त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा.
  • यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा. पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
  • या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.

विजेती रक्कम कशी मिळवाल?

तुम्हांला 'आकर्षक पुष्पराज लॉटरी'मध्ये तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता, तसेच Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल.यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर, Pan Card Number, Adhar Card Number ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 Witness त्यांचा पत्ता, मोबाइल नंबर, Pan Card Xerox, Adhar Card Xerox ही कागदपत्र स्वाक्षरी करून देणं आवश्यक आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jan 09, 2020 11:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).