Maharashtra Lottery Akarshak Pushkaraj Result: 'महाराष्ट्र राज्य लॉटरी' मध्ये आज संध्याकाळी 'आकर्षक पुष्पराज लॉटरी' निकाल lottery.maharashtra.gov.in वर होणार जाहीर
आज महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या 'आकर्षक पुष्पराज लॉटरीचं' तिकीट काढलं असेल तर पहा तुम्ही निकाल lottery.maharashtra.gov.in वर ऑनलाईन कसा पाहू शकाल?
Akarshak Pushkaraj Weekly Draw Result: महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या (Maharashtra State Lottery) माध्यमातून दर गुरूवारी आकर्षक पुष्पराज लॉटरी जाहीर केली जाते. सुमारे 11 लाख रूपयांचे पहिले आणी सर्वाधिक रक्कमेचे बक्षीस दर गुरूवारी जिंकण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकजण या 'पुष्पराज लॉटरी'मध्ये आपलं नशीब आजमवत असतात. आज संध्याकाळी 4.15 च्या सुमारास ऑनलाईन या लॉटरीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे तुम्हीदेखील आज महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या 'आकर्षक पुष्पराज लॉटरीचं' तिकीट काढलं असेल तर पहा तुम्ही का निकाल ऑनलाईन माध्यमातून कसा पाहू शकाल?
महाराष्ट्र राज्य लॉटरीचा निकाल ऑनलाईनप्रमाणेच ऑफलाईन माध्यमातून नियमित वर्तमानपत्रामध्येही जाहीर केला जातो. महाराष्ट्र राज्य लॉटरी रिझल्ट lottery.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर pdf फॉरमेट मध्ये जाहीर झाल्यानंतर तुम्ही तो डाऊनलोड करून पाहू शकाल.
आकर्षक पुष्पराज लॉटरीमध्ये पहिले बक्षीस 7 लाख रूपयांचे आहे. तर त्यानंतर 7000 हजार रूपयांची 9 बक्षिसं जाहीर केली जाते. तर 2000, 1000, 500 आणि 200 रूपयांची प्रत्येकी 6 बक्षीसं जाहीर केली जाणार आहे. तर 100 रूपयांची 600 बक्षीसं जाहीर केली जाणार आहेत.
विजेती रक्कम कशी मिळवाल?
तुम्हांला 'आकर्षक पुष्पराज लॉटरी'मध्ये तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता, तसेच Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल.यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर, Pan Card Number, Adhar Card Number ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 Witness त्यांचा पत्ता, मोबाइल नंबर, Pan Card Xerox, Adhar Card Xerox ही कागदपत्र स्वाक्षरी करून देणं आवश्यक आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Dec 12, 2019 12:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

