Maharashtra Lockdown: महाराष्ट्रातील निर्बंध रविवारपासून शिथिल होणार, काय राहणार सुरु आणि काय बंद? घ्या जाणून
दरम्यान, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने राज्यातील नागरिकांना दिलासा देण्यात आला होता.
Lockdown In Maharashtra: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने राज्यातील नागरिकांना दिलासा देण्यात आला होता. याचपार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनाचे निर्बंध आणखी शिथिल करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार, राज्यातील शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट, स्पा आणि जिमच्या वेळेत आणि क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, महाराष्ट्र सरकारने फ्रंटलाइन कामगार, अत्यावश्यक कामगार आणि पूर्णपणे लसीकरण केलेल्या व्यक्तींसाठी लोकल ट्रेन पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. यामुळे राज्यातील निर्बंधांत शिथिलता देण्यात यावी, अशा मागणींनी जोर धरला होता. याचपार्श्वभूमीवर राज्यातील काही निर्बंध शिथिल करून नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता मर्यादित आहे. दररोज केवळ 1300 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन केले जाते. परंतु, राज्यात यापुढे प्रतिदिन 700 टन मेट्रीक ऑक्सिजनची गरज भासू लागल्यास पुन्हा कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल, असाही इशारा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. हे देखील वाचा- Covid-19 Update in Maharashtra: राज्यात आज 6,686 नवे कोरोना रुग्ण; 158 मृत्यू
काय सुरु राहणार?
- मुंबई लोकल ट्रेन-
कोरोना प्रतिबंध लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार आहे. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील, त्यांना 15 ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करण्याची करण्याची परवागनी देण्यात आली आहे.
रेस्टॉरंट आणि दुकाने-
खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आणि दुकाने आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने खालील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरू करण्याची मुभा देण्यात येत आहे. तसेच रेस्टॉरंट आणि दुकानांना फक्त रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, व्यवस्थापक, वेटर, कुक/क्लीनर, बारटेंडर यांनी लशीचे दोन्ही डोस घेतलेले असावे. तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस उलटणे गरजेचे आहे.
शॉपिंग मॉल-
राज्यातील शॉपिंग मॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहे. महत्वाचे म्हणजे, मॉलमधील कर्मचारी कोरोना प्रतिबंध लशीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. तसेच नागरिकांनाही कोरोना लसीकरण प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा आणि इनडोअर स्पोर्ट्स-
वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी. वातानुकूलित असल्यास, वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील. इनडोअर स्पोर्ट्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे आणि व्यपस्थापनाने कोरोना लशीचे दोन्ही डोस घेल्यास परवानगी असणार. बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मलल्खांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडूंसाठी परवानगी आहे.
काय बंद?
- राज्यातील धार्मिक स्थळे बंद राहतील
- सिनेमागृह आणि मल्टिप्लेक्स मॉल बंद राहतील
- परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी लस घेणे बंधनकारक आहे.
- वाढदिवस साजरा करणे, राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणुका, प्रचार, रॅली, निषेध मोर्चे यांसारख्या मोठ्या कार्यक्रमावर बंदी कायम राहील.
महत्वाचे म्हणजे, राज्यातील रुग्ण संख्येत वाढ झाल्यात राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात येतील, असा इशाराच राज्य सरकारने दिला आहे.