Maharashtra Lockdown: राज्यात लॉकडाउन लावण्यासंबंधित अद्याप कोणताही विचार नाही- राजेश टोपे
अशात राज्यात पुन्हा लॉकडाउन लावणार का? असा सवाल आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांना करण्यात आला.
Maharashtra Lockdown: देशासह राज्यात कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉनमुळे (Omicron) भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे महापालिकेकडून सातत्याने सावधगिरी आणि योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहे. ओमिक्रॉन संदर्भात राज्य सरकारने नव्या गाइडलाइन्स ही जाहीर केल्या आहेत. अशात राज्यात पुन्हा लॉकडाउन लावणार का? असा सवाल आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांना करण्यात आला. त्यावर आता राजेश टोपे यांनी उत्तर देत असे म्हटले की, अद्याप राज्यात लॉकडाउन लावण्यासंदर्भात कोणताही प्लॅन नाही आहे. परंतु 3T सुत्रांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याकडे भर दिला जात आहे.
कोविड19 च्या काळातील 3T सुत्र म्हणजे टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट. आरोग्यमंत्र्यांचे हे विधान अशावेळी आले जेव्हा महाराष्ट्रात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. तर कल्याण-डोंबिवलीतील कोविड19 पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची चाचणी आता निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्याला डिस्चार्ज दिला गेला आहे. तर राज्यात लॉकडाउन लावण्याचा विचार नाही. तसेच टास्क फोर्स कडून सुद्धा त्या संदर्भात काही सुचना आलेल्या नाहीत.(महाराष्ट्रात पहिलाच आढळलेला Omicron च्या रुग्णाचे COVID19 चे रिपोर्ट्स निगेटिव्ह, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांची माहिती)
परंतु टोपे यांनी असे म्हटले की, परिस्थितीवर अधिक करडी नजर ठेवली जाणार आहे. त्यानुसारच केंद्र सरकारच्या गाइडलाइन्स, राज्यातील टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्बंधासंबंधित निर्णय घेतला जाईल. त्याचसोबत आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षण दिसून येत आहेत. परंतु त्याची झपाट्याने लागण होत असल्याचे ही समोर आले आहे. राज्य सरकारकडून या कोरोनाच्या नव्या रुग्णाच्या विरोधात लढण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी 1 नोव्हेंबर पासून राज्यात येणाऱ्यांची चाचणी सुद्धा केली जात आहे.
दरम्यान, ओमिक्रॉनचा धोका पाहता केंद्र सरकारकडून घाणा आणि तांझिनियाला प्रभावित देशांच्या यादीत टाकले आहे. परंतु टोपे यांनी आश्वासन दिले की, आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्याचा त्यांचा कोणताही उद्देष नाही आहे.