Maharashtra Legislative Session 2021: विधिमंडळ परिसरात भाजपची प्रतिविधानसभा, सत्ताधारी आमदार आक्रमक; विधानसभा आध्यक्षांच्या आदेशाने कारवाई
विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सभागृहातील सदस्यांची मागणी आणि भावना जाणून घेऊन विधिमंडळ परिसरात सुरु असलेल्या प्रतिविधानसभेत वापरले जाणारे माईक जप्त करण्याचे तसेच या प्रकाराचे होत असलेले लाईव्ह प्रसारण बंद करण्याचे आदेश दिले.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशानतील (Maharashtra Legislative Session 2021) आजचा (6 जुलै) दुसरा आणि शेवटचा दिवस मोठा वादळी ठरतो आहे. विधिमंडळात गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत काल भाजपच्या 12 आमदारांचे गैरवर्तण करण्यात आले. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी भाजप विधिमंडळ परिसारत काहीसा आक्रमक पाहायला मिळाला. विरोधी पक्षात असलेल्या भाजपने विधिमंडळ परिसरातच प्रतिविधानसभा (Prati Vidhansabha) भरवली. यावर सत्ताधारी मंत्री आणि आमदारांनी जोरदार आक्षेप घेतला. विधिमंडळ परिसरात सुरु असलेला हा प्रकार थांबविण्यास सांगितला. विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सभागृहातील सदस्यांची मागणी आणि भावना जाणून घेऊन विधिमंडळ परिसरात सुरु असलेल्या प्रतिविधानसभेत वापरले जाणारे माईक जप्त करण्याचे तसेच या प्रकाराचे होत असलेले लाईव्ह प्रसारण बंद करण्याचे आदेश दिले.
भारतीय जनता पक्षाने विधिमंडळ परिसरात भरविलेल्या प्रतिविधानसभेविरोधात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रथम आवाज उठवला. विधिमंडळ परिसरात अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करत असताना विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेणे आवश्यक असते. त्यामुळे सभागृहाबाहेर जो प्रकार सुरु आहे त्यासाठी विधानसभा सदस्य या नात्याने आपली जाबादारी घेतली आहे का? तिथे काही कागद वाटण्यास, स्पीकर लावण्यास परवागनी देण्यात आली आहे का? असा सवाल सभागृहात उपस्थित केला. तसेच, सभागृह परिसरात कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य कृत्य खपवून घेतले जाऊ नये अशी मागमी केली. (हेही वाचा, Sanjay Raut on Suspension of BJP MLA: 'केले तुका झाले मका! आमच्यावर बॉम्ब टाकायला गेले, त्यांच्याच हाता फुटला'; शिवसेना खासदार संजय राऊत यांची भाजपवर टोलेबाजी)
दरम्यान, भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला सभागृहातील इतर सदस्यांनीही जोरदार समर्थन दिले. विधिमंडळ परिसरात अशा प्रकारची प्रतिविधानसभा भरवणे हा सभागृहाचा अपमान आहे. हा कसला प्रकार बाहेर सुरु आहे? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. जर बाहेर सुरु असलेल्या प्रकारावर कारवाई होत नसेल तर, तातडीने आपण आपले सभागृह स्थगित करुया, अशी मागणी पृथ्विराज चव्हा यांनी केली.
अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांनीही भाजपच्या प्रतिविधानसभेला जोरदार विरोध करत हा प्रकार तातडीने थांबविण्यात यावा. तसेच, तिथे वापरेल जाणारे माईक काढून घेण्यात यावेत. या सर्व प्रकाराचे दुरचित्रवाहिन्यांवरुन सुरु असलेले थेट प्रक्षेपणही थांबविण्यात यावे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रतिविधानसभेत वापरले जाणारे माईक जप्त करण्याचे बंद करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानुसार सुर७ा रक्षकांनी प्रतिविधानसभेतील माईक काढून घेतले. या वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काहीसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी तिथेच ठिय्या मांडत प्रसारमाध्यमांपुढे आपली कैफियत आणि भूमिका मांडली.